1 जुलै हा कृषी दिन व डॉक्टर डे म्हणून साजरा केला जातो
शिवशाही वृत्तसेवा जिल्हा प्रतिनिध जिल्हा शिवाजी कुंटूरकर
दि.1 जुलै हा कृषी दिन व डॉक्टर डे म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने आज नरसी येथे फुले शाहू आंबेडकर क्रांती मंच च्या वतीने नरसी येथील सर्व डॉक्टरांना वृक्षांचे झाड देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी सर्वात जास्त ऑक्सिजन देनारे पिंपळाचे झाड व पुष्पहार घालून सन्मानित करण्यात आले. उपस्थित डॉ. संतोष मोरे, डॉ. संतोष धुप्पेकर, डॉ. शिवकुमार जुक्कलकर, डॉ.विलास मुसळे, डॉ. जाधव, डॉ. रोडे मॅडम , डॉ. देशमुख यासह अनेक डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे आयोजन फुले शाहू आंबेडकर क्रांतीमंचच्या वतीने करण्यात आले अध्यक्ष भास्कर भेदेकर, जिगळा येथील उपसरपंच नागसेन जिगळेकर, संदीप उमरे, रातोळीचे उपसरपंच धम्मानंद सोनकांबळे, गंगाधर भेदे, ब्रम्हा कांबळे, राम टेकाळे, सतीश इंगोले, यासह अनेकजण उपस्थित होते. झाडे तर कोणीही वाटप केल्या जातात आणि फोटो काढून त्याची प्रसिद्धी महत्त्वाची नाही तर भविष्यासाठी झाडे जगणे टिकविणे वाढवणे हे महत्त्वाचे असून भविष्यकाळात ऑक्सिजनचा प्रमाण फार मोठ्या प्रमाणात संघटना सामोरे जावे लागणार आहे तेव्हा झाडे जगणे महत्त्वाची आहे म्हणून दिलेल्या झाडांचं महत्त्व मूल्य आपण जपून घ्यावे असाही प्रमाणे उद्देश या कार्यक्रमाचा होता.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा