चौफळा येथील विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशी निमित्त फराळाचे वाटप
शिवशाही वृत्तसेवा,जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
जुन्या नांदेड शहरातील प्राचीन काळातील विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर असून या मंदिरात शिवसेना व युवा सेनेच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त नांदेड जिल्हा शिवसेनेचे संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांच्या हस्ते फराळाचे वाटप करण्यात आले. यावेळी दक्षिणचे जिल्हाप्रमुख प्रदीप उर्फ बंडूभाऊ खेडकर जिल्हाप्रमुख बबनराव बारसे नांदेड नांदेड उत्तर शहर प्रमुख गौरव कडगिरे पिंटू भाऊ संनप सुनील पाटील यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे आयोजक नांदेड दक्षिणचे शहर प्रमुख अर्जुनसिंह ठाकूर युवा सेना जिल्हा समन्वयक अँड.अक्षय वट्टमवार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी हजारो भाविकांनी फराळाचा लाभ घेतला यावेळी उपस्थित युवा सेनेचे शहर गजानन हरकरे व राजू हरकरे श्रीहरी शिंदे मनीष झगडे गजानन शास्त्री तुळशीदास नंदाने गोविंद खरात जगदीश भैया ठाकूर व इतर पदाधिकाऱ्यांनी हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले आहे.
आषाढी एकादशी या पवित्र सणामुळे वारकरी बांधवांना फळांची व्यवस्था करून त्यामध्ये आम्हाला एक आगळावेगळा आनंद वाटला आहे असेही यावेळी त्यांनी भावना व्यक्त केली आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा