स्थानिक नारायणराव नागरे महाविद्यालयातील विज्ञान शाखेतील दणदणीत निकाल
शिवशाही वृत्तसेवा,जिल्हा प्रतिनिधी प्रतिक सोनपसारे , बुलढाणा
स्थानिक नारायणराव नागरे महाविद्यालयातील विज्ञान शाखेतील माजी विद्यार्थी सत्यम संजय श्रीवास्तव (कायस्थ ) NET/SET/ MPET/ GATE वनस्पतीशास्त्र विषयात उत्तीर्ण होऊन महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे त्यांनी प्राप्त केलेले यश हे महाविद्यालयातील व ग्रामीण भागातील शेतकरी शेतमजूर कष्टकरी पालक व विद्यार्थ्यांना प्रेरणादायी असल्याचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आमदार श्री तोतारामजी कायंदे साहेब यांनी व्यक्त केले.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य तथा संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉक्टर विजय नागरे सर यांनी त्यांच्या यशाबद्दल विशेष करून त्यांचे आई वडील यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमासाठी गावातील प्रसिद्ध प्रसिद्ध उद्योजक निवृत्ती वायाळ प्रतिष्ठित नागरिक पंकजभाऊ जाधव श्री समाधान घुगे व महाविद्यालयातील प्राध्यापक सुधाकर तारे प्रा मिलिंद गवई प्रा महेश कायदे प्रा कु नयना गवारे प्रा कु तमन्ना शेख श्री नरेंद्र गवई श्री गजानन मुंडे श्री गजानन कायंदे श्री अनिल गायकवाड सौ सुरेखा मोरे हे हजर होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा