maharashtra day, workers day, shivshahi news,

शंकरराव वाघमारे व सौ चांगुनाबाई अशोक बैलकवाड हे निवडून आल्यानंतर सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी दोन्ही उमेदवारांना अडीच अडीच वर्षासाठी सरपंच पदासाठी नेमणूक करण्याची प्रक्रिया ठरवली होती

शेळगाव छत्रीग्र  ग्रा.प.सरपंच पदी सौ.चांगुनाबाई बैलकवाड यांची बिनविरोध निवड

Mrs-Changunabai-Bailakwad-was-elected-unopposed , Shankarao Waghmare , Shelgaon , nanded , shivshahi news.


शिवशाही वृत्तसेवा, नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर


तालुक्यातील मौजे शेळगाव छत्री ग्रामपंचायत निवडणूक गेल्या अडीच वर्षाखाली पार पडल्यानंतर सरपंच पद हे अनुसूचित जातीसाठी आरक्षित होते या पदाचे दोन उमेदवार जळबा शंकरराव वाघमारे व सौ चांगुनाबाई अशोक बैलकवाड हे निवडून आल्यानंतर सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी दोन्ही उमेदवारांना अडीच अडीच वर्षासाठी सरपंच पदासाठी नेमणूक करण्याची प्रक्रिया ठरवली होती. जळबा वाघमारे यांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर सर्व सदस्यांनी संजय पाटील चोंडे यांच्या नेतृत्वाखाली सौ चांगुणाबाई अशोक बैलकवाड यांची सरपंच पदी बिनविरोध निवड केली आहे.

जळबा वाघमारे यांचा अडीच वर्षाची सरपंच पदाची मुदत संपल्यानंतर नूतन सरपंच पदाची निवड करण्यासाठी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी श्री कानोले यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले आहे. ग्रामपंचायत सदस्य दिगंबर पेदे, संजय जयवंतराव आणेराये,सौ.आशा बालाजी सालेगाये, श्रीमती अहिल्याबाई बालाजीराव चोंडे,सौ. संध्या संजय आनेराये, सौ.शिवकांता शिवाजी आणेराये,सौ. मीना गजानन धम्मे, जळबा शंकर वाघमारे यांनी बिनविरोधपणे सौ.चांगूनाबाई अशोक बैलकवाड यांची सरपंच पदी निवड करून गावचा मोठेपणा राखला आहे. ही निवड प्रक्रिया वेळी निवडणूक निर्णय अधिकारी कानवले ग्रामसेवक येरसनवार, ज्येष्ठ नागरिक पुंडलिक पाटील आणेराये,चेअरमन माधव शाहपुरे, व्हाईस चेअरमन माधवराव सालेगाये, तंटामुक्ती अध्यक्ष माधव बैलकवाड, शालेय समिती अध्यक्ष सुरेश सालेगाये, उपाध्यक्ष यम ए बैलकवाड, माजी उपसरपंच दत्तराम बैलकवाड, यादवराव पाटील पेदे, खुशाल सालेगाये, नागनाथ चोंडे, मारुती कोंडाजी शहापुरे, माजी सैनिक गंगाधर शहापुरे, संभाजी निलावार, माधव ज्ञानोबा सालेगाये, गोविंद सालेगाये, मारुती कांबळे, विश्वंभर धसाडे, दिगंबर झुंजारे, माधव ऐंजपवाड, प्रदीप झुंजारे व ग्राम स्वच्छता महिला यांची उपस्थिती होती.


सदर सरपंच पदाची निवड प्रक्रिया संपल्या नंतर मा.आ. वसंतराव चव्हाण यांच्या जनसंपर्क कार्यालय नायगाव येथे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीनिवास पाटील चव्हाण व काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष संजय बेळगे यांनी आजी-माजी सरपंचाचा सन्मान करून भावी कार्यास शुभेच्छा दिले यावेळी नगरसेवक दयानंद भालेराव, ताकबीडचे माजी सरपंच शिवराज वरवटे, सुजलेगावचे सरपंच दत्ता आईलवार, उपसरपंच सुधाकर बकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.


----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !