नायगाव ग्रामीण रुग्णालयात दत्ता हरी वडजे यांचा सेवापुर्ती कार्यक्रम संपन्न
शिवशाही वृत्तसेवा,जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
नायगाव ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी दत्ता हरी वडजे यांचा सेवापुर्ती कार्यक्रम दिनांक 30 जून 2023 रोजी नायगाव ग्रामीण रुग्णालयाची वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पोहरे साहेब, यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच संपन्न झाला आहे.
दत्ता हरी वडजे या कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्यांनी आपल्या कार्य सेवेमध्ये अनेक रुग्णांची प्रमाणिकपणे सेवा केली त्यांचे मूळ गाव कंधार तालुक्यातील वरवट येथील रहिवासी असून मेडिकल कॉलेज मध्ये चार वर्षे त्यांनी सेवा केली त्यानंतर कायम ऑर्डर मांडवी इथे झाल्यानंतर देगलूर आणि नायगाव येथे त्यांची उर्वरित सेवा झाल्यानंतर शासनाच्या नियमाप्रमाणे यशस्वीरित्या आपली कार्य सेवा पूर्ण करून सेवेतून सेवानिवृत्त होत.
असताना या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे म्हणून केदार पाटील साळुंखे तर ग्रामीण नायगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शीला बोकारे, डॉक्टर प्रशांत सोनकांबळे, डॉक्टर नाईक, डॉक्टर पानझडे मॅडम, डॉक्टर वानोळे, मॅडम डॉक्टर, श्रीकांत साहेब, यासह या प्रमुख मान्यवर व डॉक्टर मंडळीच्या उपस्थितीमध्ये दत्ता हरी वडजे यांचा भव्य असा सत्कार करून त्यांच्या कार्याचा आढावा यावेळी अनेकांनी व्यक्त केलेला आहे या सेवा कृती कार्यक्रम सोहळ्यास भोपळे साहेब, जमदाडे साहेब ,एच.डी जाधव, शिवाजी भुताळे, हनुमंत पवार, गोविंद कदम, अनार गंगातीरे, शहापुरे मामा ,मटवाले मामा, रोहित शेठ, सिद्धांत काळेवार, मतीन पठाण, किरण मोरे, कैलास शिंदे, अरुणा वडजे, ज्ञानेश्वर गागरे यासह दत्ता हरी वडजे यांचे नातेवाईक यांची मुले सुनील दत्ता वडजे, परमेश्वर दत्ता वडजे आणि जावई परबत पाटील साळुंखे यांचीही यावेळी उपस्थिती होती सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल कांबळे यांनी केले आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा