हदगाव तालुका आरोग्य अधिकारी यांना महापुरुषांच्या फोटोची एलर्जी का ..?
शिवशाही वृत्तसेवा,जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांची जयंती 26 जून रोजी महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयात साजरी करण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु हदगाव येथील तालुका आरोग्य अधिकारी यांच्या कार्यालयात छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली नसल्याचे आमच्या प्रतिनिधी यांना समजले असता त्यांनी आरोग्य अधिकारी यांच्या कार्यालयात दुपारी २.०० वाजता जाऊन विचारपूस केली असता त्या ठिकाणी जयंती साजरी करण्यात आली नव्हती.तेव्हा आमच्या प्रतिनिधीनी तेथील कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता मोठे साहेब येणार आहेत म्हणून जयंती साजरी करण्यात आली नसल्याचे सांगण्यात आले. काही वेळा नंतर ही जयंती आमच्या प्रतिनिधी समक्ष २.३६ वाजता साजरी केली आहे.
दुसऱ्या दिवशी तालुका आरोग्य अधिकारी यांना विचारणा केली असता त्यांनी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती ही ११.०० वाजता साजरी केली आहे अस सांगण्यात आले आहे यावरून येथील तालुका आरोग्य अधिकारी यांना आपल्या कार्यालयात केव्हा जयंती साजरी करण्यात आली हे माहीत नाही ही खूप मोठी शोकांतिका आहे .एक विषय बाब म्हणजे तालुका आरोग्य अधिकारी यांच्या कार्यालयात एकाही महापुरुषांचे फोटो नसल्याचे समोर आले आहे. यावरून येथील नागरिकांच्या मनात सभ्रम निर्माण होत आहे .तालुका आरोग्य अधिकारी यांना महापुरुषांच्या फोटोची एलर्जी का ..? असा ही प्रश्न नागरिकांतून व्यक्त होत आहे यावर वरिष्ठ अधिकारी यांच्या वर काय कारवाई करतील हे सर्व सामन्याचे लक्ष लागले आहे .
सर्व शासकीय कार्यालयामध्ये महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथी साजरा केल्या जावे असा शासनाचा आदेश असला तरी मगरूर कर्मचाऱ्यांनी जयंती साजरी न केल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी कारण महापुरुषाचा आवाहन करणे हे त्यांच्या कर्तव्याला सोभणारी गोष्ट नाही.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा