ॲक्टिव बालवाडी चा पायी दिंडी सोहळा उत्साहात संपन्न
शिवशाही वृत्तसेवा,जिल्हा प्रतिनिधी परभणी बाळासाहेब घिके
आषाढी एकादशी निमित्त आज पंढरपूरात ज्या प्रकारे मोठा उसत्व साजरा केला जातो त्याच पद्धतीने आज परभणी शहरात ही मोठ्या उत्साहात आषाढी एकादशी साजरी करण्यात आली विविध शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी आज काढण्यात आलेल्या पायी दिंडी सोहळ्यात आपला सहभाग नोंदविला होता. तर सुभाष रोडवर असलेल्याॲक्टिव बालवाडी च्या चिमुकल्यानी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
ॲक्टिव बालवाडीच्या वतीने मागील 21 वर्षा पासून एकादशी निमित्त पायी दिंडी शहरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरा पर्यंत काढून समारोप केला जातो आज काढण्यात आलेल्या दिंडी मध्ये चिमुकल्यानी विठ्ठल रुक्मिणी, सोपान काका, मुक्ताबाई, व वारकऱ्यांच्या वेशभूषा परिधान करून सहभागी झाले होते. दिंडी दरम्यान शाळेच्या प्राचार्या आशा कोलपेकवार सह शिक्षिकानी शिवाजी चौकात लेझीम, फुगडी, पावल्या खेळण्याचा आनंद घेतला. व शाळेच्या वतीने दिंडीत सहभागी झालेल्या विध्यार्थ्यांना प्रसाद व गिफ्ट ही वाटप करण्यात आले. आज काढण्यात आलेल्या पायी दिंडी सोहळ्यात ॲक्टिव बालवाडीच्या प्राचार्या आशा कोलपेकवार, सोनाजी कोलपेकवार, सीमा मॅडम, नूतन मॅडम, दीपाली फुटाणे, कल्पना सुभेदार, सह पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा