भारतीय जनता पार्टीचे सिंदखेडराजा तालुका नेते शेख जावेद यांची मागणी
शिवशाही वृत्तसेवा बुलढाणा, (जिल्हा प्रतिनिधी प्रतीक सोनपसारे)
ग्रामपंचायत कार्यालयाने जे ओटे बांधून दिले आहेत त्या ओट्यांच्या आजुबाजुला पाऊस पडल्यामुळे गटार तयार झाले आहे त्यामुळे दुसरबीड येथील नागरिकांना व तसेच बाजारासाठी येणाऱ्या इतर गावातील लोकांनां घाणीतून बाजार करावा लागत आह या अशा परिस्थिती मुळे ग्राहक ओट्यांकडे जात नाही व शेतकऱ्यांना आपला माल खाली चिखलात बसून विकावा लागत आहे त्यामुळे अनेक भाजीपाला विकणाऱ्या व्यापारी व शेतकरी वर्गाने दुसरबीड च्या आठवडी बाजाराकडे पाठ फिरवली आहे भा ज पा तालुका सिंदखेड राजा चे नेते शेख जावेद यांनी या सर्व बाबीकडे ग्रामपंचायत ने लक्ष घालून सर्व ओट्याच्या खाली गट्टू बसवून शेतकऱ्यांना त्रास मुक्त करावे ही मागणी आज सरपंच प्रकाश सांगळे व सचिव श्री . चौधरी यांच्याकडे केली आहे
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा