महसूल अधिकार्याचे दुर्लक्ष
शिवशाही वृत्तसेवा,जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
बिलोली तालुक्यातील मौजे कोळगाव येथील गोदावरी नदी पात्रातून इंधन व बोटच्या साह्याने सर्रासपणे अवैधरित्या रेती उपसा चालू असूनही याबाबत तहसीलदार निळे साहेब मंडळ अधिकारी सौ जिगळेकर आणि तलाठी सोनुले या महसूल अधिकाऱ्यांचे सरळ सरळ दुर्लक्ष असल्याने रेतीमाफियावर अजून कुठलीही कारवाई झालेली नाही किंवा अवैधपणे रेती उपसा करणाऱ्या वर आळा बसलेला नाही.एकीकडे गोर गरीबाची रेती अभावी प्रधानमंत्री आवास योजनेची घरकुल बांधकामाची कामे कित्येक ठिकाणी खोळंबलेली आहेत .
त्याबाबत तहसीलदार यांना कुठलीही सदर घरकुला लाभधारकाबद्दल कीव आलेली नाही पण आपल्या स्वार्थाने बरबटलेल्या मनाने रेतीमाफियाकडून छुपे हस्ते होउन या लालची पोटी रेतीमाफीयांना रेती उपसा करण्याबाबत मुभा दिलेली आहे म्हणून कोळगाव येथील गोदावरी नदीपात्रातून इंधन व बोटच्या साह्याने सरासपणे अवैधरित्या रेती उपसा चालू आहे तेव्हा वरिष्ठांनी लक्ष देणे गरजेचे आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळेवर लक्ष नाही दिल्यास गोदावरी नदीपात्रात वाळूचा एक कणही दिसणार नाही आणि भविष्यात गोरगरिबाची घरे कधीच पूर्णत्वाकडे जाणार नाहीत म्हणून रेतीमाफीयासह संबंधित महसूल अधिकाऱ्यांवर देखील योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी डेबोजी क्रांती दलाचे मराठवाडा विभाग उपाध्यक्ष शिवाजी यादवराव ईबीतदार यांनी निवेदनाद्वारे दिलेली आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा