maharashtra day, workers day, shivshahi news,

पंढरपुरात विठ्ठलाच्या दारी संपन्न झाला 'ढ लेकाचा चित्रपटाच्या पोस्टर प्रदर्शनाचा सोहळा !

'ढ लेकाचा' चित्रपटाद्वारे प्रेक्षकांना एक वेगळीच पर्वनी यातून पाहायला मिळणार

Dha Leka movie poster exhibition ceremony , Ayush Ulagadde , pandharpur , shivshahi news.


शिवशाही वृत्तसेवा जिल्हा प्रतिनिधी पंढरपूर

सध्या सगळीकडे आषाढी वारीचं मंगलमय वातावरण आहे. सध्या वारकरी संप्रदायासोबतच अनेक कलाकार सुद्धा विठुरायाच्या भक्तीत तल्लीन झाल्याचं दिसून येत आहे. आपल्या लाडक्या विठूरायासाठी वारी करणाऱ्या भक्तांच्या आणि अगदी सर्वांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असणाऱ्या विठ्ठलाचा महिमा अपरंपार आहे. विठ्ठलाप्रमाणेच सर्वांच्या मदतीला धावून जाणाऱ्या भाल्याचा खडतर प्रवास ढ लेकाचा या चित्रपटातून येत्या २६ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


आज या सिनेमाचं पोस्टर पंढरपुरातील प्रसिद्ध विठ्ठलाच्या मंदिरात प्रमुख कलाकार आणि तंत्रज्ञांच्या उपस्थितीत प्रदर्शित करण्यात आले. अत्यंत निरागस भाव असलेलं हे लोभस पोस्टर पाहताच चित्रपटाच्या कथाविश्र्वाची कल्पना येते. पोस्टरवरील नवोदित बाल कलाकार आयुष उलागड्डे त्याच्या चेहर्यावरील विलक्षण भावमुद्राभिनय पाहून रसिक प्रेक्षकांना ढ लेकाचा चित्रपटाबद्दल प्रेक्षकांच्या मनात कमालीचे कुतूहल निर्माण झाले आहे. आषाडीच्या अगदी दोन दिवस अगोदर 'ढ लेकाचा' हा चित्रपट अल्ट्रा झक्कास या ओटीटीवर प्रदर्शित होणार असल्याने संपूर्ण वारकरी संप्रदायासोबतच महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षकांसाठी आपल्या प्रिय विठूयायचा हा प्रसादच आहे असं म्हटल्यास वावगं ठरू नये.


दिग्दर्शक जोगेश्वर ढोबळे दिग्दर्शित 'ढ लेकाचा' या चित्रपटाची कथा भाल्या या तरुण मुलाभोवती फिरते, भाल्याच्या शाळेत शिकत असणा-या विक्की देशमुख या विद्यार्थ्याला असलेल्या पैशाच्या माजामुळे गुंडगिरीचा सामना करत तसेच शाळेतील शिक्षणप्रणालीच्या अडचणींना तोंड देत शालेय जीवनात संघर्ष करावा लागतो. भाल्याचं त्याचे वडील आणि पाळीव बकरी बादशाहसोबत एक भावनिक नातं तयार होताना दिसत आहे. आपल्या मुलाच्या मूलभूत गरजा पुरवण्यासाठी अथक परिश्रम करत असताना भाल्या आणि त्याचे वडील सदा लोहार यांच्यातील नात्याचे सुंदर चित्रिकरण या चित्रपटात करण्यात आले आहे. या चित्रपटात बाल कलाकार आयुष उलागड्डे सोबतच अतुल महेल, मुकुंद वसुले यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

'ढ लेकाचा' चित्रपटाद्वारे प्रेक्षकांना एक वेगळीच पर्वनी यातून पाहायला मिळणार आहे. नुकत्याच संपन्न झालेल्या 'अंबरनाथ फिल्म फेस्टिवल'ने या चित्रपटामधील बालकलाकार आयुष उलागड्डेच्या उत्तम अभिनय कामगिरीची ओळख प्रेक्षकांना पुरस्कारामार्फत करून दिली आहे. दर्जेदार आणि उत्तम कथा यासारख्या वेगवेगळ्या पठडीतले आशयघन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणत 'अल्ट्रा मीडिया आणि एंटरटेनमेंट'मार्फत ढ लेकाचा सारख्या दर्जेदार मराठी चित्रपटाची जादू प्रेक्षकांना लवकरच अनुभवता येतील.

----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !