रोजगार हमी योजना व फलोत्पादान मंत्री श्री.संदीपनजी भूमरे यांची पंढरपूरला भेट
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (शहर प्रतिनिधी हुसेन मुलाणी)
श्री विठ्ठल रुक्मिणीचे घेतले दर्शन
महाराष्ट्र राज्याचे रोज़गार हमी योजना व फलोत्पादान मंत्री श्री.संदीपनजी भूमरे यांनी पंढरपूरला भेट देऊन श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले यावेळी त्यांनी आषाढी एकादशी निमित्त 151 भजनी मंडळांना एक पेटी मृदंग विना आणि 25 टाळ याप्रमाणे भेट देण्यासाठी भजन साहित्याचे सेट खरेदी केले त्यामध्ये 151 मृदंग 151 हार्मोनियम 151 विना व जवळपास पावणे चारशे टाळ यांचा समावेश आहे.
जिल्हा संपर्कप्रमुख महेश साठेंच्या निवासस्थानी भेट
मंत्री संदिपान भुमरे खाजगी पंढरपूर दौऱ्यानिमित्त पंढरपूरला आले असता शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख महेश साठे यांच्या निवस्थानी दिली भेट. महेश साठे व परिवाराकडून यावेळी तुळशीचा भला मोठा हार शाल श्रीफळ व फेटा बांधून सत्कार केला यावेळी शिवसेना सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख महेश साठे यांच्यासह टाकळी ग्रामपंचायत सदस्य संजय साठे, नागरबाई साठे, रेश्मा साठे, रोहिणी साठे व साठे परिवारातील सर्व सदस्य तसेच सुर्यकांत भोसले, माणिक सय्यद, माऊली देशमुख, मारुती माने, बापू उखंडे, गणेश ढोणे,राजू पाटिल,सुरेश मेणसे, राजू शेख, बापू डोंगरे, नितीन खडतरे, धीरज टिकोरे, अजिंक्य सपाटे, तात्या घाडगे, योगेश गायकवाड, अमोल अळकुंटे, सोनू माने, अविनाश देवकते, किशोर नलवडे, स्वप्नील पाटोळे व इतर मान्यवर उपस्थित होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा