नायगाव मतदार संघात भाजप पक्ष कोणी वाढविला
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
नायगाव मतदार संघात भाजप पक्ष कोणी वाढविला असा कोणीही प्रश्न केला तर रस्त्यावरचा भिकारी देखील सांगेल की बालाजी बच्चेवार कारण लोकांच्या गळ्यातील ताईत असलेला बच्चेवार यांना आजवर पक्षांनी न्याय का दिले नाही हा प्रश्न मात्र नायगाव मतदार संघातील लोकांच्या मनात असला तरी आणि बालाजी बच्चेवार यांची आमदार होण्याची इच्छा जनतेकडून पूर्ण होईलही परंतु भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी भांडवली उमेदवारांना डावलुन एका निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय देईल काय असा प्रश्न मात्र लोकांच्या मनात आहे.
नायगाव मतदार संघात भाजप पक्षाकडून आमदार होण्यासाठी अनेक जण आसुसलेले आहेत आणि तेवढीच अंतर्गत गटबाजी देखील आहे आणि ती गटबाजी संपुष्टात येईल असे सध्या तरी वाटत नाही. आमदार राम पाटील रातोळीकर यांचे पक्ष वाढीसाठी फार मोठे योगदान नसतानाही विधान परिषदेवर सदस्य म्हणून त्यांची वर्णी पाटील रातोळीकर कोणालाही चहा देखील न पाजविता आमदार झाले असे विधान एका कार्यक्रमात डॉक्टर मीनल खतगावकर यांनी केले होते. तरआमदार राजेश पवार देखील आयत्या बिळातील नागोबा ठरले आहेत.
कारण इथे वटवृक्ष एखाद्याने लावून वाढवावा आणि त्या छायेखाली दुसऱ्यानेच विसावा घ्यावा अशीच गत बच्चेवार यांची झालेली आहे पक्षावर निष्ठा ठेवून पक्षाशी एकनिष्ठ राहून आणि लोकांच्या मनामध्ये कायम राहून बालाजी बच्चेवार यांना पक्षाने न्याय न दिल्यामुळे त्यांच्या कार्याची चालना देणारी चाकी गतिमान झाली नाहीत, हीच शोकांतिका अनेक सुज्ञ नागरिकांना वाटते आहे.बालाजी बच्चेवार यांनी यापूर्वी नायगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व नायगाव बरबडा सर्कल मधून दोन वेळा जिल्हा परिषद सदस्य म्हणून झाले. बरबडा सर्कल मधील जिल्हा परिषदेची निवडणूक अटीतटीची असताना देखील लोकांनी बच्चेवार यांना पसंती दर्शविली त्याचे प्रामुख्याने कारण असे की, सर्वसामान्य माणसापुढे एक वेगळी परिस्थिती निर्माण झाली आणि त्यावेळेस जो साह्य होईल त्यांच्याविषयी मनात एक अस्था निर्माण होते.
तसे बच्चेवार यांच्याविषयी अस्था निर्माण झालेली होती, कारण पावसाने थैमान घातले होते, बरबडा सर्कल मधील अनेक गावागावात गोदावरी नदीच्या पुराचे पाणी शिरल्याने त्यांना धीर देणे आणि मदतीचा हात देणे हे बच्चेवार यांना जमले परंतु तेव्हा काँग्रेसचे विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्ष रावसाहेब पाटील मोरे टाकळीकर होते पण यांना जमले नाही काळ उलटून गेला पण परिस्थितीची जाण लोकांच्या मनात कायम राहीली. जिल्हा परिषद निवडणुका लागल्या पण वास्तविकता बरबडा सर्कल मधील रावसाहेब पाटील टाकळीकर यांना नाकारून आणि पक्षा सोबतच बंडखोरी केलेले गंगाधर बडुरे यांनाही झुगारून नायगाव येथील रहिवासी असलेले बालाजी बच्चेवार यांचा लोकांनी दणदणीत विजय केला, तेव्हा जिल्ह्यातील बड्या बड्या नेत्यापुढे बालाजी बच्चेवार हे एक आवाहन ठरले होते.
एका प्रामाणिक कार्यकर्त्याची कदर करणारे लोक आजही आपल्या विचारावर ठाम आहेत, सर्वसामान्य माणसांना पक्ष गट तट याची काही देणे घेणे नसते, त्यांनी फक्त आपला कोण एवढेच ठरविलेले असतात. म्हणून बच्चेवार अनेकांच्या मनात असल्याने ते येथील नावलौकिक नाव आहे कारण त्यांनी अपप्रवृत्तीला कधी थारा दिलेला नाही. गैर व भ्रष्ट अधिकाऱ्याची कधी खैर केली नाही. राजकारणातील चतुरता, अनेक सभा गाजविणारा स्पष्ट व निर्भीड वक्ता आणि तेवढाच प्रेमळ व सर्व गुणसंपन्न असलेले बच्चेवार हे परवाच आपल्या वाढदिवसानिमित्त आमदार होण्याची इच्छा व्यक्त केली परंतु तो निर्णय पक्षक्षेष्टीकडे राहील आणि तो मला मान्य राहील असे पत्रकारांशी म्हणाले होते. परंतु भाजपाच्या वरिष्ठ नेत्याकडे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर आणि भविष्यात बच्चेवार विषयी प्रस्ताव मांडतील काय आणि जनतेकडून इच्छा पूर्ण होईल पण पक्षाने बालाजी बच्चेवार यांना 2024 मध्ये तरी न्याय देईल काय असा प्रश्न बच्चेवार यांचे समर्थक करीत आहेत.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा