लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त नारीशक्तीचा सन्मान
शिवशाही वृत्तसेवा,जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त नारीशक्तीचा सन्मान हाच देशाचा अभिमान ही घोषणा देत महाराष्ट्र सरकारच्या वतीने तालुक्यातील मौजे शेळगाव छत्री येथील माजी सरपंच सौ.सुनीता संजय आनेराये व उपसरपंच आशा बालाजी सालेगाये यांच्या कार्याची दखल घेऊन ग्रामपंचायत स्तरीय पुरस्कार बहाल करण्यात आला आहे.
मौजे शेळगाव छत्री ग्रामपंचायत कार्यालय येथे महाराणी अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त प्रतिमेस सरपंच सौ चांगुनाबाई अशोक बैलकवाड, संजय पाटील चोंडे, ज्येष्ठ नागरिक पुंडलिक पाटील आणेराये, माजी सरपंच जळबा वाघमारे, माजी सैनिक गंगाधर शहापुरे, संजय माली पाटील आनेराये, चेअरमन माधव शहापुरे, तंटामुक्ती अध्यक्ष माधव बैलकवाड, शालेय समिती अध्यक्ष सुरेश सालेगाये, प्रकाश पाटील साखरे,प्रा.अनिल अनेराये, ग्रामसेवक नारसनवाड, रोजगार सेवक प्रकाश बैलकवाड, सुरेश करकले, माधव ज्ञानोबा पा. सालेगाये, यासह अधिजणांनी अभिवादन केले असून ग्रामसेवक नारसनवाड,प्रा. अनिल आनेराये, पत्रकार माधव बैलकवाड, गुरुनाथ सालेगाये, यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या महान कार्या वरील विचार व्यक्त केले.
अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्ताने महाराष्ट्र शासनाच्या वतीने ग्रामपंचायत स्तरीय पुरस्कार सौ.सुनिता संजय आनेराये,सौ.आशा बालाजीराव सालेगाये यांना बहाल करण्यात आला असून या पुरस्काराचे स्वरूप सन्मान चिन्ह, प्रशस्तीपत्र,शाल, श्रीफळ व रोख रक्कम असे होते यावेळी ग्रामपंचायत सदस्य दिगंबर पेदे, ग्राम स्वच्छता महिला गिरजाबाई सूर्यवंशी,चंदरबाई वाघमारे, चौत्राबाई बैलकवाड, चौत्राबाई कांबळे, राहुबाई बैलकवाड, माधव ऐंजपवाड,ऑपरेटर मलिकार्जुन कुंभार, सेवक आनंदा नामेवार यासह अधिजनाची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा