कुंटुर येथे महिला बचत गटाची चळवळ ही जोमाने सुरू
शिवशाही वृत्तसेवा,जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
नायगाव तालुक्यातील कुंटूर येथील ग्रामपंचायत अंतर्गत गावातील महिला बचत गटातील महिलांनी आपल्या व्यवसाय सुरू करून मुंबई येथील महालक्ष्मी सरस मध्ये दीड लाखाच्या वर घोंगडीचा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाण चालून बचत गटाची चळवळ सक्षमपणे उभे करून पुढे नेण्याचे काम करत आहे.
यासाठी कुंटुर येथे महिला बचत गटाची चळवळ ही जोमाने सुरू असून गावामध्ये 63 बचतगट योग्य पद्धतीने बैठका घेऊन कर्ज घेऊन उद्योग व्यवसायाला लागले आहेत. त्यासाठी गावातील एक समूहा संसाधन व्यक्ती रेखाताई कांबळे यांनी या सदर महिला बचत गटाच्या पारंपारिक व्यवसाय असलेल्या घोंगडीला उच्च स्तरावर मेळाव्यामध्ये दाखल करून त्यांना एक रोजगाराचे साधन मिळून दिले. त्यामुळे सदर महालक्ष्मी महिला बचत गट असतील अध्यक्ष माळसाबाई वडे व सचिव गंगाबाई माहादळे यांना आज अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त अहिल्याबाई होळकर कर्तुत्वान महिलांचा महिलांना पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी ग्रामपंचायत कार्यालय कुंटुर येथे गटविकास अधिकारी आर एल वाजे, विस्तार कानोडे, ग्रामविकास अधिकारी नागेश्वर येडसनवार, यांच्यासह उपसरपंच शिवाजी पाटील होळकर , यांच्या हस्ते गावातील दोन महिलांना सन्मानचिन्ह शाल श्रीफळ व पाचशे रुपये पुरस्कार देऊन आज सन्मान करण्यात आला.
सदर महिला हे धनगर समाजातील असून त्यांचा पारंपारिक व्यवसाय म्हणून घोंगडी बनवतात याचे त्यांनी चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळून आपल्या परिवाराच्या गाडा चालवतात असून त्या गटातील दहा महिला हे त्याच व्यवसायाने आपले पोट भरत आहे.
अहिल्याबाई होळकर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी गावातील सर्व महिला बचत सदस्य रेखाताई अनिल कांबळे समुह संसाधन व्यक्ती तसेच गावातील प्रतिष्ठित मंडळी उपस्थित होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा