पिशोर गावात अकस्मात मृत्यू
शिवशाही न्यूज, प्रतिनिधी मिलिंद कुमार लांडगे, छत्रपती संभाजीनगर कन्नड
सोनू रवींद्र टोंपे (वय 18) असे मयत तरुणाचे नाव आहे .या विषयी अधिक माहिती अशी की, पिशोर पोलिस ठाण्याच्या पाठीमागील परिसरात मयत तरुण सोनू हा आई वडिल, दोन लहान भाऊ यांच्यासोबत किरायाच्या घरात राहत होता. मिळेल ते काम करून मोलमजुरी करणारा सोनू बुधवारी दुपारपर्यंत त्याच्या मित्रांसोबत होता. घरी आल्यानंतर शेजारी ठेवलेली घराची चावी घेऊन त्याने घर उघडले. दोन दरवाजे असलेल्या घराचा समोरील दरवाजा बाहेरून बंद करून त्याने पुन्हा एकदा चावी शेजारी ठेवून दिली.
पाठमागील दरवाजाने प्रवेश करून हा दरवाजा सुद्धा बंद करून घेतला. दुपारी साडेपाच वाजेदरम्यान मयत सोनूचे वडील घरी आल्यानंतर दरवाजा उघडल्यावर त्यांना सोनू घरातील पत्र्याच्या अँगलला दोरीने गळफास घेतल्याचे आढळून आले. त्याच्या वडिलाने आरडाओरडा केल्याने आजूबाजूच्या नागरिकांनी धाव घेतली. पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत खाली उतरवले व ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्याला तपासून मृत घोषित केले. आत्महत्येचे नेमके कारण माहीत होऊ शकले नाही. पिशोर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून या घटनेची नोंद घेण्यात आली.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा