पाउले चालती पंढरीची वाट
शिवशाही वृत्तसेवा,नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटुंरकर
हदगाव तालुक्यातील मोजे कामारी येथील श्री संत संभाजी भाऊ महाराज यांच्या पावन भूमी असणाऱ्या कामारी, येथून वैकुंठ वासी वेंकटेश महाराज कामारीकर ,राजेश्वर महाराज कामारीकर हे गेल्या 23 वर्षापासून सतत आळंदी ते पंढरपूर जाणाऱ्या ज्ञानेश्वर माऊलींच्या दिंडीत सहभागी होत असतात. वेंकटेश महाराज कामारीकर यांचा कोरोना काळामध्ये मृत्यू झाला आहे.
सतत त्यांचा वारसा चालू राहावा या उदांत हेतूने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दीपक महाराज व भागवत महाराज कामारीकर यांनी २०० संत मंडळी सोबत घेऊन कमारी येथून आळंदी पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याकरिता संभाजी भाऊ महाराज कामारीकर यांच्या नावाने नावाजलेल्या या दिंडी चे प्रस्थान कामारी येथून झाले आहे यात २०० संत मंडळी,असंख्य महिला व पुरुष या दिंडी मध्ये सहभागी होते. ..
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा