नूतन मराठी माध्यमिक विद्यालयाचे इ.१० वी परीक्षेत उज्वल यश..
शिवशाही वृत्तसेवा जिल्हा प्रतिनिधी मंगळवेढा
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ,पुणे यांच्यावतीने इ १ं० वीचा निकाल दि २ जून २०२३ रोजी दु १ वा ऑनलाइन जाहीर करण्यात आला.मंगळवेढा येथील नूतन मराठी माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी यावर्षी उत्तुंग यश मिळवले.प्रशालेत प्रथम क्रमांक अथर्व संतोष भगरे ९१.८० % द्वितीय क्रमांक कु समीक्षा नाना ढाणे ९०% तृतिय क्रमांक वैष्णव शिवाजी कांबळे ८९.६० % गुण मिळवत यशाची परंपरा कायम ठेवली आहे.यावर्षीही प्रशालेचा निकाल १००% लागला असून ज्यामध्ये २४ विद्यार्थ्यांनी विशेष श्रेणी,२० विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी तर १२ विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणीत यश मिळवले.
यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशालेचे मुख्याध्यापक गुरनिंग बंडगर,वर्गशिक्षक योगेश कुलकर्णी,सुभाष गायकवाड विठ्ठल जमखंडी,अवंती पटवर्धन,श्रीराम पाटील,राधिका कुसाळकर यांचे मार्गदर्शन लाभले.शिक्षकांनी व पालकांनी केलेलं मार्गदर्शन,घेतलेला सराव विद्यार्थ्यांनी केलेले स्वयं अध्ययनमुळे उत्तुंग यश मिळवले.
विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल संस्थाअध्यक्ष प्रा आर एन कुलकर्णी,उपाध्यक्षा निर्मलाताई पटवर्धन,सचिव आप्पासाहेब महालकरी,मुख्याध्यापक गुरनिंग बंडगर,प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सुनीता औताडे तसेच सर्व संचालक,संचालिका,शिक्षक,
पालक विद्यार्थी यांनी गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा