अकोट ग्रामीण पोलिसांची धडक कार्यवाही
शिवशाही वृत्तसेवा, अकोला (जिल्हा प्रतिनिधी संजय क्षीरसागर) आकोट
अकोट तालुक्यातील ग्रामिन पोलीस स्टेशनचे धडाकेबाज कारवाई दिनांक 08/06/2023 रोजी पो स्टे अकोट ग्रामीणचे पोलीस उप निरीक्षक विजय पंचबुधे व स्टाफ असे पो स्टे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की, मोहाला येथील जमीर बेग मुश्ताक बेग, व धारगढ येथील अरुण करणसिंग बेठेकर असे दोघे शासनाने प्रतिबंधीत केलेला सुगंधित पान मसाला व गुटखा विक्री करीत असून तो गुटखा धारगड येथील अरुण करणसिंग बेठेकर ह्याचे घरामधे ठेवलेला आहे.
अशी खात्री लायक माहिती मिळालेवरून त्यांनी सदर माहिती पो स्टे अकोट ग्रामीणचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख ह्यांना देऊन त्यांचे आदेशावरून दोन पंचांसह धारगढ येथे जाऊन अरुण बेठेकर ह्याचे घराची झडती घेतली असता त्याचे घरामधे शासनाने प्रतिबंधीत केलेला सुगंधित पान मसाला व गुटखा असा 26,280/रू चा मुद्देमाल मिळालेवरून सदरचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच आरोपी 1) अरूण करणसिंग बेठेकर, वय 42 वर्ष, रा. धारगढ व 2) जमीर बेग मुश्ताक बेग, वय 32 वर्ष, रा. मोहाळा ह्यांना अटक करण्यात आली असून पुढील तपास अकोट सुरू आहे.
सदरची कार्यवाही मा. गोकुळ राज, उपविभागीय पोलीस अधिकारी अकोट, नितीन देशमुख, पोलीस निरिक्षक अकोट ग्रामीण ह्यांचे मार्गदर्शनात पो उप निरीक्षक विजय पंचबुधे, पो कॉ शैलेश जाधव, पो कॉ गोपाल जाधव, पो. कॉ . सचिन कुलट म. पो. कॉ. पुजा वानखडे, यांनी केली असून पुढील तपास पो उप निरीक्षक विष्णु बोडखे करीत आहेत.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा