पालकमंत्री शोधा ११०० रुपये बक्षीस मिळवा
शिवशाही वृत्तसेवा , नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
मागील पाच दिवसापासुन जिल्हात आवकाळी पाऊस सैताना सारखा पडत आहे. गारपीट आणि वादळी वाऱ्याने पिके ,फळबागा उध्वस्त झाल्या आहेत. विजपडुन शेतकरी व मुकी जनावरे दगावली आहेत. अशी परिस्थिती शेतकऱ्यावर ओ़ढावलेली असताना देखील आमदार मोहदय सेल्फी काढण्यात तर खासदार साहेब मार्केट कमिटीच्या निवडणुकीत उमेदवार कसे पडले याचे चिंतन करण्यात व्यस्त आहेत. नांदेड चे पालकमंञी मा.नामदार गिरीश महाजन हे देखील पद आल्यापासून बेपत्ता झाले आहेत. त्यामुळे पालकमंत्र्यांना शोधणाऱ्याला रोख ५१ रुपयाचे बक्षीस नायगाव तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष माणिक चव्हाण यांच्या वतीने जाहीर केले आहे.
नांदेड जिल्हाला आवकाळी पावसाने झोडपुन काढले आहे. तालुक्यात प्रत्येक मंडळात विज पडुन गाय म्हैस शेळी मेढी बैल दगावल्याच्या घटना घडल्या आहेत.शेतक-याचा मृत्यु होत आहे. पाच दिवसा पासुन वादळी वारा, गारपिट, आवकाळी पावसाने कांदा, उन्हाळी सोयाबीन, फळेभाज्या पालेभाज्या, मोसंबी,टरबूज,पपई व इतर फळबागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मात्र नांदेड जिल्ह्यात कुठेही प्रशासनाने पंचनामे केलेले नाहीत की येवढे मोठे संकट ओढावलेले असताना देखील पालकमंञी कमीत कमी धिर द्यायला देखील आले नाहीत.
त्यामुळे नायगाव तालुक्यातील शेतकरी आक्रमक असून पालक मंत्री दिसेल तिथे त्यांचा ‘शेतकरी स्टाइल, ने सत्कार करणार आहेत. त्यामुळे पालकामंत्र्याना शोधून देणाऱ्यास रोख ११०० रुपये बक्षीस दिले जाणार आसल्याचे बॅनर नायगाव तालुक्यात गावोगावी लावण्यात आले आहेत. हे बक्षीस नगदी स्वरूपात दिले जाणार आहे. तरी या आंदोलनात उपस्थित नगरसेवक विठ्ठल बेळगे.नगरसेवक प्र. हनुमंत बोईनवाड. प्रताप पाटील सोमठाणकर तालुकाध्यक्ष छावा संघटना . बालाजी पाटील शिंदे. नवनाथ पाटील जाधव. अभिजीत मंगरुळे .बालाजी धोते .साईनाथ वाडीकर . संभाजी खडके.भूषण काळेवार .हनुमंत जकले .यशवंत मांजरमकर. मंगेश बच्छाव .महेश पवार. सुनील शेळगावे. बजरंग पाटील कदम .व शेतकरी बांधव उपस्थित होते.
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा