छत्रपती संभाजी महाराज उद्यान मेट्रो स्थानक बनणार ऐतिहासिक वारसा
शिवशाही वृत्तसेवा, पुणे (शहर प्रतिनिधी दिगंबर वाघमारे)
काय आहे नेमका मावळा पगडी मेट्रो स्टेशन
मेट्रो मार्गावरील स्थानक उभारले जात आहे. या स्थानकाला मावळा पगडीचा लुक दिला गेला आहे. शहरातील विविध मेट्रो स्थानकांना शहराची ओळख निर्माण करुन देणारे पारंपरिक लुक देण्याचे महामेट्रोने ठरविले आहे
त्यानुसार मेट्रो स्थानकाची रचना केली जात आहे. पुणे मेट्रोच्या छत्रपती संभाजी महाराज उद्यान स्थानकावर ऐतिहासिक ‘मावळा पगडी’चे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मावळा पगडीचा एक प्रकार जो सन्मानाचे प्रतीक असून महाराष्ट्रीयन संस्कृतीचा महत्त्वपूर्ण भाग आहे. टेक्ला सॉफ्टवेअरचा वापर करून प्रगत स्ट्रक्चरल डिझाईन तयार करणाऱ्या कॉन्स्ट्रक्टेबल बीआयएम सॉफ्टवेअरने हा आराखडा केला आहे.
देशातील सर्वात खोल मेट्रो स्टेशन
पुण्यात देशातील सर्वात खोल मेट्रो स्टेशन होत आहे. पुण्यातील सिव्हिल कोर्ट इंटरचेंज मेट्रो स्टेशन जवळपास तयार झाले आहे. हे काम 95 टक्के पूर्ण झाले आहे. स्टेशनची खोली अंदाजे 31 मीटर म्हणजे108 फूट पेक्षा जास्त आहे. यामध्ये 18 एस्केलेटर आणि आठ लिफ्ट्स बसवल्या आहेत.
काय आहेत वैशिष्ट्ये
- सिव्हिल कोर्ट इंटरचेंज मेट्रो स्टेशनवर कार, बाईक आणि सायकलसाठी पार्किंगची जागा.
- सिव्हिल कोर्ट इंटरचेंज मेट्रो स्टेशन कॉम्प्लेक्सला जोडण्यासाठी भुयारी मार्ग बांधला जात आहे.
- सिव्हिल कोर्ट इंटरचेंज मेट्रो स्टेशनला हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रोच्या तिसऱ्या लाईनशी जोडण्यासाठी फूट ओव्हर ब्रिज.
कोच अॅल्युमिनियम धातूपासूनमेट्रोचे कोचेस संपूर्णपणे अॅल्युमिनियम धातूपासून निर्माण केलेले आहेत. कोलकाता स्थित तितागड वॅगन कंपनीने पुण्याच्या महामेट्रोसाठी अॅल्युमिनियमच्या कोचचे लाँचिंग केलं आहे. तितागड वॅगन कंपनीला डिझाईन, उत्पादन, पुरवठा अशा अटींवर पुणे मेट्रो प्रकल्पासाठी कंत्राट दिले होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा