maharashtra day, workers day, shivshahi news,

पळवे खुर्द येथे मंडळ अधिकारी कार्यालयाची स्थापना पारनेर नगर मतदार संघाचे आमदार निलेशजी लंके यांच्या हस्ते उदघाटन

पळवे खुर्द येथे मंडळ अधिकारी कार्यालयाची स्थापना

Establishment of Mandal Adhikari Office at Palave Khurd , MLA Nileshji Lanka , Parner , shivshahi news.


शिवशाही वृत्तसेवा, प्रतिनिधी सुदाम दरेकर पारनेर  

मंडळ अधिकारी कार्यालय हे वाडेगव्हाण येथे असल्यामुळे शेतकऱ्यांना त्या ठिकाणी जावे लागत होते. ही अडचण लक्षात घेत हे कार्यालय जवळ असण्यासाठी अनेकांनी याचा पाठपुरावा केला होता. त्यामध्ये प्रामुख्याने अखिल भारतीय माहिती सेवा समितीचे पदाधिकारी तसेच सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे यांच्यावतीने तहसील कार्यालयामध्ये भजन व टाळे ठोक आंदोलन केले होते. 


त्यावेळी या कार्यालयाला मंजुरी भेटली होती. परंतु जागे अभावी ह्या कार्यास विलंब झाला. परंतु आता यासाठी पळवे खुर्द येथे जागा उपलब्ध झाली असून हे कार्यालय पळवे खुर्द येथे सुरू करण्याचे ठरवले व उद्घाटन करून ते सुरूही झाले आहे. आता या कार्यालयामध्ये जवळपास १४ गावांचा संपर्क जोडला गेला आहे. आता आपल्या शेती संदर्भात कामासाठी वाडेगव्हाणला जाण्याची गरज नाही असे आमदार निलेश लंके यांनी सांगितले. 


या ठिकाणी उपस्थित राष्ट्रवादी तालुका युवक अध्यक्ष विक्रम सिंह कळमकर, बँक संचालक संजय तरटे, श्री काळभैरवनाथ देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष वाळवणे सचिन पठारे, मुंगशी गावचे सरपंच अनिल करपे माजि.सरपंच रामदास आबा तरटे माजि.सरपंच नानाभाऊ गाडील कर, माजी. उपसरपंच संजय नवले, उपसरपंच अमोल जाधव, माजि.उपसरपंच तात्या भाऊ देशमुख, माजि. चेअरमन रोहिदास नवले, तात्या भाऊ शेळके,पोपटराव तरटे, उद्योजक रवींद्र नवले, हरिभाऊ भंडलकर, पोलीस पाटील संभाजी पाचारणे, दत्ता गाडीलकर, डोमे भाऊसाहेब, नियुक्त सर्कल एस.एस.जेठे , तलाठी प्रकाश शिरसाट, प्रसाद तरटे,अमोल शेळके, अंबादास तरटे, अमोल तरटे, तसेच पळवे खुर्द व पंचक्रोशीतील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !