पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार 2023 व 24 याकरिता गावातील दोनमहिलांची ग्रामपंचायतच्या वतीने निवड
शिवशाही वृत्तसेवा, जिल्हा प्रतिनिधी सुदाम दरेकर पारनेर
आज बुधवार दिनांक 31 रोजी पारनेर तालुक्यातील पळवे खुर्द येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ग्रामपंचायत समोर या जयंतीच्या निमित्ताने उपस्थित ग्रामपंचायतचे उपसरपंच सर्व सदस्य सर्व महिला व समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र शासन मार्फत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार 2023 व 24 याकरिता गावातील दोन महिलांची ग्रामपंचायतच्या वतीने निवड करण्यात आली.
त्यामध्ये सौ.संगीता रामचंद्र गुंड (अंगणवाडी सेविका) तसेच सौ.स्वप्नाली दत्तात्रय देशमुख (महिला बचत गट) यांचा ट्रॉफी,सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव सत्कार करण्यात आला व या कार्यक्रमासाठी सर्व उपस्थित मान्यवरांचे ग्रामपंचायतच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी. सरपंच नानाभाऊ गाडीलकर यांनी केले.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा