आ.राजेश पवार यांचा वाढदिवस साजरा
शिवशाही वृत्तसेवा,जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
नायगाव मतदारसंघाचे आमदार राजेश पवार यांच्या वाढदिवसानिमित्त नायगाव शहरातील जयराज पॅलेस सभागृहात किर्तन रुपी सेवा आणि अन्नदान कार्यक्रम राबविण्यात आला यावेळी अनेक मतदार बांधवाकडून त्यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले.
भाजपा पक्षाचे राजेश कुंटूरकर आणि यासह मनोज मोरे, श्रीहरी देशमुख , बाबासाहेब हंबर्डे,राजु अप्पा बेळगे ,माधव चिंचले, तालुकाध्यक्ष कोंडीबा पाटील शिंदे, गजू पाटील अंतरगावकर ,मारुती कदम सोमठाणकर या भाजपा पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आमदार राजेश पवार यांचा अभिष्टचिंतन सोहळा नायगाव शहरातील जयराज पंलेज येथे साजरा करण्यात आला. सुरुवातीला मतदार बांधवांसाठी कीर्तन रुपी सेवा आयोजित करण्यात आली तर त्यानंतर सर्व स्नेही मित्र बांधवांसाठी पुरणपोळी भोजनाचा ही आस्वाद यावेळी मतदार बांधवांनी घेतलेला आहे.
भाजपा नेत्याचा वैयक्तिक कार्यक्रम असो की पक्षाचा कार्यक्रम असो नायगाव तालुक्यात सरासपणे गटबाजी दिसून येते. आमदार राजेश पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक भाजप पदाधिकाऱ्यांची अनुपस्थिती यावेळी होती मतदार बांधवातून या गोष्टीला चर्चेला उधान आले होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा