maharashtra day, workers day, shivshahi news,

नायगाव येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र, धार्मिक व सामाजिक कार्याचे केंद्र

श्री स्वामी समर्थ यांच्या पुण्यतिथीनिमित्त सामुदायिक ग्रंथ वाचना सह अनेक उपक्रम सुरू

shr Swami Samarth death anniversary, naigaon, nanded, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर) 

अखिल भारतीय स्वामी समर्थ गुरूपीठ त्र्यंबकेश्वर अध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र दिंडोरी प्रणित नायगाव येथील स्वामी समर्थ सेवा केंद्रात स्वामींच्या पुण्यस्मरणार्थ गुरू चरीत्र सह अनेक ग्रंथांचे सामुदायिक पारायण मोठ्या भक्तिभावाने सुरू झाले आहे.

 व्यंकटेश नगर नायगाव येथे असलेल्या श्री स्वामी समर्थ केंद्रात अध्यात्मिक व धार्मिक कार्यक्रमाची नेहमी रेलचेल असते.दि१२ ते १८ एप्रिल दरम्यान सकाळी ८:३०,१०:३० या वेळेत सामुदायिक पारायण होत असून जवळपास १४६ महिला तर २१ पुरुष यांनी सहभाग नोंदविला आहे, गुरू चरित्र, नवनाथ, श्रीपाद श्रीवल्लभ,दुर्गा सप्तशती, मल्हारी सप्ताह सती, माऊली खंड, स्वामी चरित्र,तेजोनिधी, भागवत, गुरू गिता आदी ग्रंथ वाचन होत आहे. सामुदायिक आरती, विष्णू सहस्त्रनाम,विना आदी सेवा सुरु आहेत. सदरील केंद्रात अनेक सामाजिक उपक्रम ही राबविल्या जातात, जवळपास अठरा प्रकारचे सेवा पुरविल्या जातात.

 बाल संस्कार केंद्र, व्यसनमुक्ती, विवाह सेवा, वास्तुशास्त्र, माहिती तंत्रज्ञान विज्ञान, स्वयं रोजगार, आयुर्वेद, कृषी मेळावा,पशु पालन, प्रश्न उत्तरे सेवा, दुःखी,पिडीत,व व्यसनाधीन व्यक्तींना भक्ती मार्गाकडे वळवून त्यांच्या जिवनात आनंद निर्माण करण्याचा उपक्रम या केंद्राद्वारे राबविल्या जातात, सदरील केंद्रा साठी भव्य सभामंडप व सुशोभीकरण करण्यात आले आहे.स्वच्छता व शांतता परिसर म्हणून या स्वामी सेवा केद्राचा नावलौकिक होत आहे.१२ एप्रिल रोजी श्रीस्वामी समर्थ यांच्या पुण्यतिथीनिमित्त अनेक सेवेकरी वेळ देऊन कार्यक्रम यशस्वी करीत आहेत.


----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !