विद्यार्थ्यांसमोर दिला महापुरुषांच्या कार्याला उजाळा
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर )
जि.प.प्रा.शा.हिप्परगा (जा) येथे सामाजिक अंधकार दूर करण्यासाठी शिक्षणाच्या क्रांतीची मशाल पेटवणारे, मुलींच्या शिक्षणाचा पाया रोवून सामाजिक अंधश्रद्धेला चिरडणाऱ्या महान विचारवंत महात्मा ज्योतीराव गोविंदराव फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. ज्योतीराव फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करुन श्री यलपलवाड सरांनी महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जीवनकार्याविषयी माहिती दिली. मुलींना शिकवणे पाप समजले जायचे त्यावेळी ज्योतीबांनी 1848 ला भिडे वाड्यात मुलींची शाळा सुरू करुन त्या समाजरुढीला झुगारुन दिले. असे उदगार श्री गायकवाड सरांनी काढले.
विद्येविना मती गेली, मतिवीना निती गेली, नितीविना वित्त गेले, वित्ताविना क्षुद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. म्हणून आपण खूप खूप शिक्षण घेऊन आपण महात्मा ज्योतीराव फुले यांचे स्वप्न साकार करणे हेच त्यांना खरे अभिवादन ठरेल असे उद्गगार मुख्याध्यापक श्री माधव वटपलवाड यांनी काढले. यावेळी सहशिक्षक श्री यमलवाड सर, श्री गायकवाड सर, श्री पचलिंग सर व सौ.शिंगडे मॅडम उपस्थित होत्या.
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा