दुसर बीड ग्रामपंचायत कार्यालय बनले शोभेची वास्तू...
शिवशाही वृत्तसेवा ,आरिफ शेख तालुका प्रतिनिधी /सिंदखेड राजा
तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेली दुसर बीड ग्रामपंचायत आहे. ग्रामपंचायत च्या कागदपत्रे कामासाठी नागरिकांना त्रास सहन करावा लागतो रहिवासी दाखला असो गाव नमुना 8 या कामासाठी ग्रामपंचायतला नागरिक जातात परंतु ग्रामपंचायतीला कुलूप असते ग्रामपंचायतचे कार्यालय हे सकाळी दहा वाजेपासून ते पाच वाजेपर्यंत उघडे असावे परंतु कर्मचाऱ्यांचे हलगर्जीपणामुळे त्या कार्यालयाला कुलूप असतात आणि कर्मचारी त्या ठिकाणी नसतात कुठेतरी बाहेर गेलेले असतात नागरिकांना एका कामासाठी वारंवार चकरा मारावे लागतात कार्यालय हे बंद का असते याकडे सचिवांचे लक्ष नाही यावरून दिसून येते कडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन कर्मचाऱ्यावर कार्यवाही करावी. अशी मागणी होत आहे.
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा