बालाजी देडगाव येथे क्रांतिसूर्य महात्मा फुले यांना अभिवादन
शिवशाही वृत्तसेवा , बालाजी देडगाव (प्रतिनिधी)
नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. येथील श्री संत रोहिदास महाराज सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खरेदी विक्रीचे संघाचे संचालक कडूभाऊ तांबे होते. यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी बालाजी देवस्थानचे सचिव शिवसेना नेते रामानंद मुंगसे, संत रोहिदास महाराज देवस्थानचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके, निवृत्ती तांबे, युवा नेते निलेश कोकरे, बळीराज्य संघटनेचे अध्यक्ष मच्छिंद्र मुंगसे यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनकार्यावर मनोगत व्यक्त केले.
यावेळी देडगाव विविध सहकारी सोसायटीचे माजी चेअरमन संतोषभाऊ तांबे, देविदास तांबे, सोपान तांबे, बाबासाहेब तांबे, लक्ष्मण तांबे, अविनाश तांबे, प्रशांत तांबे, गणेश तांबे, मिनीनाथ मुंगसे, तुकाराम चेडे, बबन तांबे, अक्षय तिडके, उद्धव देवा तांदळे, कांतीलाल तांबे, योगेश तांबे, अशोक तांबे, बंडू तांबे, बन्सी वांढेकर, शुभम कुटे, बाबुराव तांबे, उत्तमराव तांबे, निवृत्ती तांबे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके यांनी केले. सूत्रसंचालन रामानंद मुंगसे यांनी केले. तर संतोष तांबे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा