लोकांना सुदृढ आरोग्याचे साधन आणि तत्व सांगून आरोग्य क्षेत्रात क्रांती
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
स्वतःचा परिचय जगाला करून देत आरोग्य क्षेत्रात क्रांती करणारे, जनतेच्या सदृढ आरोग्याचे साधन व तत्व सांगणारा महापुरुष डॉ.शाम्युअल हैनिमन या महामानवाची नायगाव शहरातील डॉक्टर असोशियन तर्फे होमिओपॅथिकचे तज्ञ डॉ. प्रभाकर गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली जयंती साजरी करून अभिवादन करण्यात आले.
जर्मनी देशाततील सक्सोनी प्रांतात मिसेन खेड्यात जन्मा आलेले होमिओपॅथिकचे जनक डॉक्टर श्याम्युअल हैनिमन यांचा जन्म दहा एप्रिल 1755 साली सर्वसामान्य कुटुंबात झाला, आरोग्य क्षेत्रात क्रांती घडवून संपूर्ण जगाला स्वतःची ओळख करून देणाऱ्या या महामानवाच्या जयंती दिना निमित्त नायगाव शहरातील डी बी पाटील कॉम्प्लेक्स मधील डॉ. पी.पी.गायकवाड सावरखेडकर यांच्या दवाखान्यात प्रारंभी डॉ.शाम्युअल हैनिमन यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी डॉ.सौ.मिनाक्षी गायकवाड सावरखेडकर, कॉम्रेड देवराव आईलवार, डॉ. माधव खंडगावकर, डॉ. दत्तात्रय शिंपाळे, डॉ प्रकाश देगावकर, डॉ. भीष्म झुंजारे डॉ.रामशेटवाड, डॉ. वानोळे, डॉ.धनंजे, डॉ. पोलावार, डॉ. संतोष पाटील, डॉ. शिंदे, अँड.बी.एम.वाघमारे यासह अधिजनाची उपस्थिती होती.
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा