गावातील रस्ते झाले घसरगुंडी अपघाताचे प्रमाण वाढले
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
नायगाव तालुक्यातील कुंटूर येथे अंतर्गत पाईपलाईन खोदून पाणीपुरवठ्यासाठी पाईपलाईनचे कामे करण्यात आले सदर कामे साजिद गुत्तेदार यांनी 2021- 22 मध्ये कामे करून सदर रस्ता खोदून टाकले मात्र रस्ता बनवला नाही. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडून पाणी सासून नागरिकांचे अपघात होत आहे. गावातील मुख्य रस्त्याने सदर पाईपलाईन खोदून चांगला शीशी रस्ता खोदून चिखलाचे साम्राज्य बसणारा रस्ता बनवल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त होत आहे.
रस्त्यावरून नालीचे पाणी सर्रास वाहत असून रस्त्यामध्ये चढउताराचे खड्डे बनले आहे. त्यामुळे रस्त्यावर सरळ व साप रस्ता दिसून येत नसल्याने अंतर्गत गावातील सर्वोच्च रस्ते ओबडधोबड झाल्यामुळे साधे चालले देखील कठीण होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. गावातील सी सी रस्ते बनवण्यासाठी लाखो रुपये खर्च दाखवण्यात आला.
गुत्तेदाराने अमाप पैसा घेऊन पाणीपुरवठ्याचे कामे करून प्रसार झाला की काय असे चर्चा नागरिकांत होत असून सिमेंट रस्ते तोडून पाईपलाईन केल्यामुळे सिमेंट रस्ते बनवून देण्याची जबाबदारी गुत्तेदाराची होती याकडे दुर्लक्ष होत असून ग्रामपंचायतने सदर गुतेदारास बोलून रस्ता दुरुस्ती करून देण्यात यावे. गावातील अंतर्गत अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा