भाजपाचे मंडळ सरचिटणीस सिद्धार्थ कसबे यांनी मनपा आयुक्त यांना दिले होते निवेदन
शिवशाही वृत्तसेवा नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
नांदेड शहरांमध्ये गोरगरीब जनतेला माहाराष्ट्र शासनाच्या व मनपाच्या वतीने रमाई आवास घरकुल योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात घरकुल दिले जाते पण सदरील घरकुलाच्या नावाखाली प्लेनेज कन्स्ट्रंन्टस मार्फत लाभार्थ्याकडून आर्थिक व्यवहार झाल्याशिवाय त्यांचे बिल दिले जात नाही अशी तक्रार दिनांक २७.०३.२०२३ रोजी भाजपाचे मंडळ सरचिटणीस सिद्धार्थ कसबे यांनी मनपा आयुक्त यांना दिले होते त्यांच्या निवेदनाची दखल घेऊन अतिरिक्त आयुक्त यांनी झालेल्या भ्रष्टाचाराचे तात्काळ चौकशी करण्याचे आदेश बी एस यु पी विभाग प्रमुखांना दिले आहेत त्याचप्रमाणे त्यांचे कोणतेही काम करण्यास नकार घंटा देत आहेत.
संबंधित कंपनीमध्ये काम करणाऱ्या मनपा मधील कर्मचारी हे दाम घेतल्याशिवाय काम करत नाहीत रमाई आवास योजनेमध्ये नाव टाकल्यापासून ते पहिला टप्प्याचा लाभ मिळेपर्यंत सर्व भ्रष्टाचार चालत आहे घरकुलामध्ये बोगस नावे टाकण्यासाठी कंपनीचे लोक प्रत्येक नावासाठी पाच हजार रुपये घेतात व कामाचा वर्क ऑर्डर साठी पाच हजार त्यानंतर प्रत्येक फाईलच्या ऑनलाईन बिलासाठी प्रत्येकी चिरीमिरी देऊन कर्मचाऱ्याकडून फाईल ही शाखा अभियंताकडे जाते ते पण प्रत्येक फाईल साठी चेरीमरी घेऊन नंतर त्यांच्याकडून फाईल ही शहर अभियंता यांच्याकडे जाते ते त्या फाईलची शहानिशा न करता प्रत्येक फाईलवर कंपनीच्या लोकांकडून टक्केवारी घेऊन फाईलवर सही करतात.
नंतर ती फाईल संबंधित ऑडिटर कडे जाते ते प्रत्येकी फाईल साठी चिरीमिरी घेऊन नंतर फाईल लेखा विभागात जाते सर्व प्रकार दलाला मार्फत मोजक्या लोकांकडून केला जात असल्याची तक्रार मनपा आयुक्त यांच्याकडे एका लेखी निवेदनाद्वारे भाजपाचे मंडळ सरचिटणीस सिद्धार्थ कसबे यांनी दिली होती दिलेल्या निवेदनावर चौकशी न झाल्यास महापालिकेसमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा देखील देण्यात आला होता या निवेदनाची दखल घेऊन तात्काळ चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त यांनी बीएसयुपी चे विभाग प्रमुख याला दिले आहेत आता काय चौकशी होणार याकडे नांदेड शहरातील रमाई आवास घरकुल योजनेत बोगस कामे करून बिले काढलेल्याची धाबे दणाणले आहेत .
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा