मेळघाटचे आमदार तसेच सर्व पक्षाचे पदाधिकारी सोबतच हज्जारोच्या संख्येत नागरीकांची उपस्थिती
शिवशाही वृत्तसेवा, अमरावती (प्रतिनिधी संजय क्षीरसागर)
देशात आणि राज्यात आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 14 एप्रिल रोजी भारतासह जगभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या जयंतीला आंबेडकर जयंती किंवा भीम जयंती म्हणून ओळखले जाते. डॉ बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या देशातील आघाडीचे आणि महान समाजकार्य केलेले महापुरष म्हणून ओळखले जातात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मेळघाटची आर्थिक राजधानी धारणी शहरात सुद्धा मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आली आहे.
धारणी शहरातील विश्वशांती बौद्ध विहार धारणी येथुन सर्वप्रथम पंचशील ध्वजारोहण व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पूजन व हारार्पण तसेच बुद्ध वंदना कार्यक्रम घेऊन रॅलीची सुरुवात करण्यात आली. या रॅलीमध्ये मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल, विश्वशांती बुद्ध विहार संस्थेचे अध्यक्ष एड सुभाषजी मनवर, उपाध्यक्ष पंकज मोरे, धारणी पंचायत समितीचे माजी सभापती रोहित पटेल, पोलीस निरीक्षक सुरेंद्र बेलखेडे, महाराष्ट्र जनक्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष मन्ना दारशिंबे, धारणी नगरपंचायतचे माजी उपाध्यक्ष सुनील चौथमल व इतर प्रतिष्ठित नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते. रॅलीमध्ये युवकांनी मोठ्या संख्येत सहभाग नोंदवुन भीम गर्जेनेनी संपूर्ण शहराला हादरवून लावले होते. सोबतच संपूर्ण धारणी शहरात निळे झेंडे लावून तसेच हातामध्ये मोठे- मोठे झेंडे घेऊन जल्लोश व्यक्त केला.
महाराष्ट्रासह भारतातील अनेक राज्यांत या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते. आंबेडकरवादी लोक या दिनाला 'समता दिन' म्हणून तर महाराष्ट्र शासन ज्ञान दिन म्हणून साजरा करते. मेळघाटात सुद्धा राजकिय पक्षाचे राजकारणी आणि आंबेडकरवादी जनतेकडुन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून आदरांजली देण्यात आली. विशेष म्हणजे धारणी शहरात काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये निळ्या आणि पिवळ्या झेंड्याची एक चांगली एकता दिसुन आली हे विशेष. सोबतच रॅलीमध्ये मेळघाटच्या संस्कृतिचे म्हणजेच गदली सुसुनचे उत्कृष्ठ असे दृष्य पहावयास मिळाले.
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा