लाभार्थ्यांची भिमजयंती गोड होणार
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
गुढी पडावा व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती सर्वांची गोड व आनंददायी होण्यासाठी राज्यातील शिंदे सरकारने 'आनंदाचा शिधा' अर्थात शंभर रुपयात चार वस्तू देण्याचा निर्णय घेतला होता. त्याअनुषंगाने धनंज येथील स्वस्थ धान्य दुकानदार विठ्ठल भीमराव जाधव यांच्या हस्ते धान्य दुकानांवर "आनंदाचा शिधा" किट वाटप करण्यास सुरुवात करण्यात आली.
राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे जनसामान्य नागरीकांची भिमजयंती ही गोड व आनंददायी होणार आहे. शंभर रुपयांमध्ये एक किलो रवा, एक किलो चनादाळ, एक किलो साखर व एक लीटर पामतेल उपलब्ध झाले आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयामुळे नायगाव तालुक्यातील धनंज गावात "आनंदाचा शिधा" किट वाटप करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे लाभार्थ्यांची भीमजयंती गोड होणार आहे. त्यामुळे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यावेळी सरपंच सौ.उज्वला पांचाळ , उपसरपंच अनिता सूर्यवंशी ,तंटामुक्त अध्यक्ष माधवराव सूर्यवंशी ,माजी तंटामुक्त अध्यक्ष दतात्र्य सूर्यवंशी ,माधवराव जाधव ,बालाजी ,जयवंतराव ,रणजित हंबर्डे ,बालाजी कोंडीबा ,हणमंत कुर्हाडे ,स्वस्थ धान्य दुकानदार विठ्ठल भीमराव जाधव ,सुवर्णाबाई गोविंदराव ,माधव धडेकर ,लाभार्थी बालाजी गोपाळराव, प्रकाश धडेकर ,जक्कोजी पांडुरंग ,रुकमाजी हंबर्डे ,रामदास जाधव ,प्रकाश पांडुरंग ,अंसाजी सूर्यवंशी गंगाधर जाधव ,केशव रामराव ,प्रवचन धडेकर आदी लाभार्थ्यांना "आनंदाचा शिधा" किट वाटप करण्यात आले.
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा