हृदयरोग आजारी रुग्णावर अमृत हॉस्पिटलमध्ये यशस्वी उपचार
शिवशाही वृत्तसेवा , नांदेड, जिल्ह प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
डॉक्टरांची सेवा ही पवित्र असते म्हणून डॉक्टरांना आधुनिक देव मानल्या जाते ही अगदी डॉक्टर मधुसूदन दिग्रस करांच्या सेवेतून दिसून येते, कारण या दोन दिवसात हृदयरोग विकार असलेल्या कैलास डाके व मंजुळाबाई भेदेकर या दोन रुग्णावर यशस्वी उपचार करून नवे जीवदान दिल्याने डॉ. दिग्रसकर व त्यांचे सहकारी डॉ. दीपिका बोंमनाळे यांचे सदर रुग्णाच्या नातेवाईकांनी आभार मानले.
वृत असे की,नायगाव शहरात गेल्या महिनाभरापासून विविध आजारावर उपचार करण्यासाठी सर्व सुविधेसह अमृत हॉस्पिटल कार्यरत झालेले आहे. अलीकडील काळात अनेकांना हृदयरोग विकार हा आजार झपाट्याने वाढत आहे. नायगाव शहरातील कैलास डाके वय 40 वर्षे यांच्या अचानक छातीत दुखणे व दम लागणे सुरू झाले होते त्यांनी लगेच अमृत हॉस्पिटल गाठले डॉक्टर दिग्रसकर व डॉक्टर बोंमनाळे यांनी त्या रुग्णाची छातीची पट्टी केली व त्यांच्या नातेवाईकांना हटॅक आल्याचे कळविले काही क्षण तर नातेवाईक स्तब्ध झाले होते.
परंतु त्यांना धीर देत सदर रुग्णांना अडीच तास आयसीयू मध्ये दाखल करून छाती बंद पडत असल्याने शॉक देऊन रक्तपुरवठा सुरळीत करण्यासाठी इंजेक्शन दिल्यानंतर या आजारांवर यशस्वी उपचार केल्याने सदर रुग्णांना नवे जीवदान मिळाले या उपचारानंतर दुसऱ्या दिवशी चीटमोगरा तालुका बिलोली येथील श्रीमती मंजुळाबाई भेदेकर वय साठ वर्ष या रुग्णांना देखील तीन दिवसापासून छातीत खूपच त्रास होत होता अमृत हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याने यादेखील रुग्णास डॉक्टर मधुसूदन दिग्रसकर व त्यांचे सहकारी डॉक्टर दीपिका बोंमनाळे, सिस्टर संध्याराणी, बंटी चोबे यांनी पूर्वीच्या रुग्णासारखाच यशस्वी उपचार केल्याने या दोन्ही रुग्णांना नवे जीवदान मिळाले असल्याने दोन्हीही रुग्णाच्या नातेवाईकांच्या चेहऱ्यावर एक आगळा वेगळा आनंद दिसून आला.
माझ्या कुटुंबावर काळाचा फार मोठा आघात होणार होता, पण यशस्वी उपचार झाल्याने माझे पती आज सुखरूप आहेत. डॉक्टर दिग्रसकर साहेबांची मी अनंत उपकार मानेन, अशा भावना कैलास डाके यांची पत्नी सौ महानंदा डाके यांनी व्यक्त केली. तर माझ्या आईना नांदेड येथे उपचारासाठी नेताना जास्तीचा वेळ आणि पैसा गेला असता परंतु कमी पैशात यशस्वी उपचार येथे झाला हे खूप मनाला समाधान वाटतं असे मंजुळाबाई भेदेकर या रुग्णाचे चिरंजीव भास्कर भेदेकर म्हणाले.
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा