दि.वृ.नि.मि.मं.म.संस्थापक अध्यक्ष मा.चंपतराव पा.डाकोरे कुंचेलीकर
दिव्यांग वृध्द,विधवा,निराधार यांना सर्व सामान्य व्यक्तीसारखे जिवन जगता यावे यासाठी शासनाकडून देण्यात येणारी दरमहा (मदत) मानधन हे फारच कमी तुटपुंजी रक्कम मिळत आसल्यामुळे व यांना काम करता येत नसल्यामुळे यांचे आर्थिक उत्पन्न नसते,त्यामुळे त्यांना ईतरानसारखे जिवन जगता येत नाही व त्यांना शासनाकडून देण्यात येणाऱ्या तुटपुंज्या मानधानत या आजच्या वाढलेल्या महागाई च्या काळात त्यांची उपजीविका भागत नसल्यामुळे उपासमारीची वेळ आली आसल्यामुळे यांच्या मानधनात वाढ करून दरमहा 5000 रूपये मानधन देण्यात यावे.महिन्याच्या पाच तारखेला मानधन वेळेवर देण्यात यावे व शासनाकडून दिव्यांग,वृध्द,विधवा,निराधारांना सर्व सोई सवलती देण्यात याव्यात.तसेच आपल्या महाराष्ट्र राज्या च्या शेजारील तेलंगणा, कर्नाटक, आंध्रा या राज्यात दिव्यांग,वृध्द,विधवा निराधारांना बऱ्याच वर्षांपासून दरमहा 3000 रूपये मानधन देण्यात येत आहे.
मात्र महाराष्ट्र राज्यातील दिव्यांग,वृध्द,विधवा,निराधारांना दरमहा 1000 रपये मानधन देण्यात येत आहे.त्यामुळे यांच्या मानधनात वाढ करून दरमहा पाच हजार रुपये देण्यात यावे व दिव्यांग कायदा 2016 कलम 92,93 च्या कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी,व यांना सर्व सोई सवलती देण्यात याव्यात यासाठी दिव्यांग,वृध्द, निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र चे संस्थापक अध्यक्ष मा.चंपतराव पाटील कुंचेलीकर यांनी शासन व प्रशासनास वेळो वेळी निवेदनातुन मागणी करूनही मानधनात वाढ करण्यात आली नाही.
त्यामुळे दिव्यांग वृध्द, निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र चे संस्थापक अध्यक्ष चंपतराव पाटील डाकोरे कुंचेलीकर व त्यांच्या संघटनेतील सहकारी व जिल्ह्यातील दिव्यांग,वृध्द,निराधारांनकडून जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष मा. जिल्हाधिकारी साहेब नांदेड यांना व संबंधित अधिकारी यांच्या कडे संदर्भ २५ निवेदन, दोन वेळा धरने आंदोलन,एका वेळी आमरण ऊपोषण व प्रत्यक्ष भेटुन चर्चा करुन तर एक वेळा दिव्यांग आयूक्त पुणे येथे बोंबा बोंब धरने आंदोलन केल्यामुळे दिव्यांग आयुक्त यांचे चार वेळा लेखी आदेश देऊन दिव्यांगाचा कायदा २०१६ ,दप्तर दिरंगाई कायदा,हे फक्त कागदावरच आहेत काय?
असा प्रश्न पडत आहे,व दिव्यांगाना का न्याय मिळत नाही?ते कमकुवत आहेत असे समजुन त्यांना चालता येत नाहि,जगात काय चालले ते दिसत नाहि,जगात कोण काय बोलतो ते ऐकु येत नाहि, व त्यांना संघर्ष करण्याची आर्थिक परिस्थिती नाहि,म्हणुन कांहि दिव्यांग आपल्या व्यंगाची पर्वा न करता ' दिव्यांग "होने का गम नहि हम किसी से कम नहि' हे दाखविण्यासाठी शासन प्रशासनास जागे करण्यासाठी दिव्यांग बांधव सनदशिर मार्गाने निवेदन,धरने,व आपण दिलेल्या आश्वासनावर शांत राहातात.
मा. जिल्हाधिकारी साहेब नांदेड यांनी दि.१५ फ्रेबु.२०२३ पर्यंत आपल्या लेटरहेडवर संबधित अधिकारी यांना आदेश दिले कि वरिल मुध्दतीत निर्यण नाहि झाल्यास संबंधित अधिकारी यांच्या वर शिस्तभंग कार्यवाही करण्याचे आपण आश्वासन दिले होते.
त्यांची आठवण दि.१७ फ्रेबु २०२३ ला निवेदनाद्वारे देऊन न्याय मिळाला नाहि म्हणुन दि.३ एप्रिल २०२३ रोजी दिव्यांगाघ्या पंधरा प्रश्नाला न्याय नाहि न्याय हक्क तरी द्या नसेल तर जिवन जगने अशक्य असल्यामुळे स्व.ईच्छा मरण्याची परवानगी द्यावी तीहि परवानगी नाहि दिल्यास दिव्यांग,वृध्द, निराधार आपल्या हक्कासाठी नाईलाजाने
आपल्या कार्यालयासमोर आत्मदहन करणयाची वेळ लोकप्रतिनिधी, प्रशासनाने येऊ देऊ नये अशी विंनती दिव्यांग,वृध्द, निराधार मित्र,मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील कुंचेलीकर यांनी माहिती दिली.
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा