निवडणूक रंगतदार होणार , 798 मतदार संख्या
ग्रामपंचायत मतदार संघामध्ये चार जागेसाठी 32 अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये सर्वसाधारण 16, अनुसूचित जातीस 6, आर्थिक दृष्ट्या मागासवर्ग 4, आडते व्यापारी 5, हमाल मापारी 1, असे असे 32 फार्म ग्रामपंचायत मतदार संघामध्ये दाखल झाले असून ग्रामपंचायत ची मतदार संख्या 349 आहे . 7 उमेदवाराला निवडून देण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यामुळे एकूण कृषी उत्पन्न बाजार समिती कूंटुर अंतर्गत 18 जागा संचालकाचे निवडून देण्यासाठी 103 उमेदवार अर्ज दाखल झाले आहेत.
कॉंग्रेस पक्षाचे नेते रविंद्र पाटील चव्हाण, राष्ट्रवादी नेते वसंत सुगावे, भाजपचे नेते रुपेश देशमुख कुंटुरकर, सर्व च पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. फार्म भरण्यासाठी एकच गर्दी झाली होती. कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक रंगतदार होण्याचे चिन्ह पाहायला मिळत असून बिनविरोध होणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समिती कुंटूर सध्यातरी मतदान निवडणूक होईल असे चर्चा सर्वत्र पाहायला मिळत आहे.
एक जागेसाठी एकच अर्ज आल्याने हमाल व मापारी या एका जागेसाठी एक अर्ज दाखल झाल्याने सदर जागा ही बिनविरोध निघत आहे की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदारसंघांमध्ये चार जागेसाठी सर्वसाधारण सोहळा अनुसूचित जाती सहा आर्थिक दृष्ट्या मागास4, आडते व्यापारी दोन जागेसाठी पाच, हमाल मापारी,1 जागेसाठी 1 अर्ज दाखल झाले. व्यापाऱ्याची मतदार संख्या , अकरा आहे तर हमाल व मापारी यांची संख्या 81 आहे .
त्यामुळे 18 जागेसाठी 103 अर्ज दाखल झाल्याने कुंटूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक रंगतदार होण्याची चिन्ह पहावयास मिळणार आहे. उमेदवारी अर्ज छाननी 5 तारखेला होईल. मागे घेण्याची 6 ते 20 एप्रिल पर्यंत राहील, 21 एप्रिल ला निवडणूक चिन्ह वाटप करण्यात येईल. 28 मार्च ला मतदान होणार व मतमोजणी 29 तारखेला निकाल जाहीर करण्यात येणार असल्याचे माहिती निवडणूक अधिकारी एम,एल, चौधरी यांनी सांगितले. यावेळी आर.जे. पलेवार साहाय्यक निवडणूक अधिकारी, बी,ही, पवार, जि,एस मिरजकर, मोरे सचिव, पवार,सेवक, उपस्थिती होती.
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा