शाळेला 100 पुस्तके व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
कृषी विभागाचे माजी कृषी पर्यवेक्षक परिवर्तनवादी विचाराचे समर्थक कै. दिगांबरराव झुंजारे यांच्या द्वितीय पूण्यस्मरणानिमित दि.03/04/2023 रोजी सोमवारी जि.प.प्रा.शा.कोकलेगाव ता नायगाव ( बा ) येथे अखिलचे तालूका उपाध्यक्ष प्रमोद केसराळीकर व त्यांच्या सौभाग्यवती वैशाली झुंजारे या दांपत्याने शाळेला 100 पुस्तके व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून एक नवा अभिनव उपक्रम राबविला आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल शिक्षक संघटनेचे जिल्हानेते गंगाधर मावले हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून नायगावचे गटशिक्षणाधिकारी नंदकुमार काकडे, विस्तार अधिकारी गंगाधर देशमुख, केंद्रप्रमुख मंगेश हणवटे, अखिलचे तालू्काध्यक्ष सुरेश बा-हाळे, केंद्रीय मु.अ.मनोहर गादेवार,पदोन्नत मु.अ.पिराजी वाघमारे, व्यंकटराव पवार,भिमराव कारताळे,सरपंच प्रतिनिधी योगेश मिरकुटे , पुंडलिक भोसले शाळेचे शिक्षक व्यंकट पुपूलवाड, डी.जी.भंडरवाड, सिताराम पाटील, शिवाजी राठोड,जोडवाड,सौ.अनुसया भेलोंडे,सौ. परविनबानू कादरी, उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी दिगंबर गोरठेकर, बालाजी बिजूरकर, प्रशांत गायकवाड अर्जुन झुंजारे,प्रविण वाघमारे, मरीबा झुंजारे ई नी या कार्यक्रमासाठी मेहनत घेतले. सदर कार्यक्रमाबद्दल अनेक शिक्षक व सामाजिक कार्यकर्त्यानी अतिशय चांगल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. प्रमोद केसराळीकर हे कै. दिगांबर झुंजारे यांचे जावई असून त्यांच्या प्रति कृतज्ञता व नवा पायंडा निर्माण करावा तसेच ईतरांनी याचा आदर्श घ्यावा अशा विचाराने हा कार्यक्रम घेण्यात आला.कार्यक्रमाच्या सुरुवातीस पिराजी वाघमारे मुख्याध्यापक ईकळी मोर यांनी प्रास्ताविकातून कै. दिगांबर झुंजारे यांच्या जीवन व कार्यावर प्रकाश टाकला. मदतनिस मंगेश झगडे यांनी उत्कृष्ठ भोजनची तयारी केली. सुत्रसंचलन युवराज आडे यांनी केले तर आभार प्रमोद केसराळीकर यांनी मानले.
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा