अवघ्या काही मिनिटांत शेतकऱ्याच्या संसाराची राखरांगोळी
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
नायगाव तालुक्यातील कुंटूर परिसरातील एक किलोमीटर अंतरावर असलेल्या मौजे परडवाडी येथील नारायण हनुमंत कराळे व पंढरी हांनमत कराळे या दोन यांच्या भावांच्या घराला आग लागून अचानक लागलेल्या आगीमध्ये गृह उपयोगी वस्तू सह कपडे, त्यामध्ये कपडे कपाट फ्रिज अन्नधान्य तसेच दागिनेसहित सर्व वस्तू जुळून खाक झाले आहेत . ह्या अचानक लागलेल्या आगीमध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले असून ग्रामपंचायतचे ग्रामसेवक तसेच तलाठी सरपंच यांनी गावातील नागरिकांनी येऊन घटनास्थळी पंचनामा केला अंदाजे सहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे पंचनामा मध्ये नमूद करण्यात आल्याची माहिती बाबुराव हनुमान नारायण कराळे यांनी दिली आहे.
सदर शेतकरी यांनी गावातील नागरिकांच्या कार्यक्रमाला गेले घाराला कुलुप लावुन बाहेर गावी गेले होते. दोन्ही घरे बंद होते बंद घरामध्ये अचानक झालेल्या आगीमध्ये पूर्ण घराचे छत सहित फ्रीज कपाट गहूपयोगी वस्तू कपडे अन्नधान्य दाळ दाणे त्यासहित असणारे पूर्ण साहित्य जळून खाक झाले. त्यामुळे सदर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे सदर अधिकाऱ्यांनी म्हटले असून याप्रसंगी तात्काळ पंचनामा करण्यासाठी ग्रामसेवक आर. डी. आगलावे ग्रामविकास अधिकारी तसेच तलाठी पवन पाटील गावातील सरपंच परडे यांनी व गावातील सर्व नागरिक यांनी येऊन पंचनामा केला
घटनास्थळी पंचनामा केल्याच्या माहितीचा रिपोर्ट तहसील कार्यालय मध्ये सादर करण्यात आल्याची माहिती यांनी दिली सदर घटना हि शुक्रवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास घडले असून परडवाडी येथील नागरिकांनी आग विजवनाचा प्रयत्न केल्याने सदर आग आटोक्यात आली. अन्यथा दोन घरे जळाली होती सदर गावापर्यंत ही आप पसरत होती त्यामुळे गावातील 70 नागरिकांनी ही आग बिजली यामध्ये लाखो रुपयाचे नुकसान झाल्याची माहिती घरमालक नारायण कराळे यांनी दिली आहे.
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा