माळी महासंघाचा प्रथमच शेती विषयक उपक्रम, प्रमुख वक्ते, हवामान तज्ञ पंजाबराव डख करणार मार्गदर्शन
शिवशाही वृत्तसेवा, अकोला (जिल्हा प्रतिनिधी संजय क्षीरसागर)
अकोट तालुका व जिल्हा माळी महासंघ कार्यकारणीच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शेतकरी मेळाव्याचे आयोजन व मार्गदर्शन करतेवेळी रविवार दिनांक 23 एप्रिल 2023 वेळ संध्याकाळ ५ वाजता स्थळ बिलबिले मंगल कार्यालय नंदीपेठ अकोट, या ठिकाणी संपूर्ण अकोट तालुक्यामधील शेतकरी बांधवांसाठी त्यांच्या शेतीचा दर्जा वाढवावा शेती बद्दल व हवामानाबद्दल तसेच जमिनीचा पोत कसा सुधारावा पावसाळी पीक अन्य विविध पिकांसाठी पावसापासून सुरक्षा व पावसाचा फायदा कसा होईल अशा पद्धतीची सर्व जैविक शेती आधुनिक शेती अशा विविध प्रकारच्या माहिती मार्गदर्शनासाठी हवामान तज्ञ तसेच अभ्यासक पंजाबराव डख यांचे प्रमुख मार्गदर्शन वक्ते शेतकरी मेळावा कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे तरी या कार्यक्रम स्थळी कार्यक्रमाचे उद्घाटक अविनाश ठाकरे,( राष्ट्रीय अध्यक्ष माळी महासंघ), प्रमुख वक्ते पंजाबराव डख (हवामान अभ्यासक,) प्रमुख पाहुणे रवींद्र अंबाळकर, अरुण तिखे, श्रीकृष्ण गोरडे, राजेश जावरकर, संजय बोरोडे प्रमुख उपस्थिती महेश गणगणे, संदीप भुस्कट ,मनोज झाडे, मयूर निमकर, दीपक खलोकार, प्रदीप लांडे, सौ. संगीताताई आढाऊ (जि.प.अध्यक्ष) सौ.संध्याताई देशकर ,ऋषिकेश सोनटक्के, सतीश चोपडे, सुनील अंबळकार, यांच्या उपस्थितीमध्ये शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले आहे.
तरी या आयोजन स्थळी प्रगतिशील शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात येईल, विविध प्रकारचे शेती विषयक आधुनिक शेती विषयक शेती उपयुक्त अवजारे पलटी फाळ नागर तसेच शेती विषयक कीटकनाशके औषधी बी बियाणे, संदर्भात ,माहिती प्रदर्शनी व स्टॉल लावण्यात येणार आहेत या स्टॉल विषयक माहिती तंत्रज्ञान घेण्याकरता शेतकऱ्यांनी आवर्जून आपली उपस्थिती लावणे गरजेचे आहे.
शेतकरी मेळाव्याचे आयोजन अकोट शहर आघाडी, शेतकरी आघाडी ,युवा आघाडी ,महिला आघाडी ,अकोट शहर महिला आघाडी ,अकोट तालुका कर्मचारी आघाडी ,ज्येष्ठ नागरिक आघाडी माळी महासंघ या सर्व माळी महासंघाच्या आघाडी व पदाधिकाऱ्यांचे या कार्यक्रमाला उपस्थिती लाभलेली आहे, तरी या सर्व कार्यक्रमाचा शेतकरी बांधवांनी आपली शेतीचा दर्जा सुधारण्यासाठी तसेच शेती विषयक सर्व माहिती मिळण्या साठी आवर्जून मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला शेतकरी मेळावा कार्यक्रमाला उपस्थिती लावावी असे आव्हान माळी महासंघ जिल्हाध्यक्ष दीपक खलोकार तसेच सर्व सदस्य गण व पदाधिकारी यांनी केली आहे.
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा