वंचित बहुजन युवा आघाडी नांदेड दक्षिण जिल्हा कार्यकारी जाहीर
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशान्वये वंचित बहुजन युवा आघाडी नांदेड दक्षिण जिल्हा कार्यकारी जाहीर करण्यात आली आहे , जिल्हा उपाध्यक्ष दीपक गजभारे यांची निवड करण्यात आली आहे. हि निवड वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष मा.डॉ निलेश विश्वकर्मा यांनी केली आहे.
वंचित बहुजन युवा आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी दीपक गजभारे यांची निवड झाल्याबद्दल ग्रामसेवक संघटनेचे तालुकाध्यक्ष टी.जी.पाटील रातोळीकर , व सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष संचिन पाटील बेंद्रीकर , यांनी त्यांच्या सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या
यावेळी बेंद्री ग्रा.प.का.उपसरपंच प्रतिनिधी सदाशिव भोस्कर , पत्रकार माधव बैलकवाड, मधुकर जवळे, पत्रकार शिवाजी कुंटूरकर , सामजिक कार्यकर्ते माधव ऐंजपवाड, मधूकर जवळे वंचित बहुजन आघाडीचे नायगाव तालुका महासचिव साहेबराव कोपरेकर वंचित बहुजन आघाडी नायगाव तालुका उपाध्यक्ष विलास वाघमारे , गौतम आढाव, व आदी उपस्थित होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा