बालाजी देडगाव येथे रामनवमी श्री राम जन्मोत्सव सोहळा
शिवशाही वृत्तसेवा, नेवासा (प्रतिनिधी विष्णू मुंगसे)
संपूर्ण भारताचे आराध्य दैवत सनातन हिंदू धर्माचा मानबिंदू मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामाचा जन्मदिवस म्हणून रामनवमीचे भारतात फारच महत्त्व आहे श्रीराम जन्मोत्सव संपूर्ण देशच नव्हे तर जगभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो गावोगावीच्या मंदिरात राम जन्माचा सोहळा रंगलेला असतो
रामनवमीला श्री राम राम जन्मोत्सवानिमित्त सर्वत्र पूजा अर्चा किर्तन प्रवचन पालखी शोभायात्रा असे वेगवेगळे आध्यात्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जात असते त्याचबरोबर लोक जवळपासच्या राम मंदिरात दर्शन करण्यासाठी ही जात असतात
नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र बालाजी देडगाव येथेही श्रीराम नवमी निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी वेगवेगळ्या समाज घटकांनी या सोहळ्यात सहभाग नोंदवून दर्शन घेतले त्याच बरोबर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी ही प्रभू रामचंद्रांच्या दर्शनासाठी हजेरी लावली होती श्रीक्षेत्र बालाजी देडगाव येथे रामनवमीनिमित्त भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी श्रीरामाचे दर्शन घेतले.
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा