विविध समाज घटक व पक्ष नेतृत्वाकडून राहुल गांडेना शुभेच्छा
अपंग शेतकरी शेतमजूर व सर्वसामान्यांच्या हक्कासाठी लढणारे कर्तव्य तत्पर आमदार माजी मंत्री बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या पंढरपूर तालुका उपाध्यक्षपदी रोपळे येथील सामाजिक कार्यकर्ते राहुल गाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे
राहुल गाडे येथील सामाजिक कार्यकर्ते असून शेतकरी कष्टकरी शोषित वंचितांचे प्रश्न सोडवण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून ते नेहमी प्रयत्नशील असतात त्यांच्या या कार्याची दखल घेऊन प्रहार जनशक्ती पक्ष व शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बच्चुभाऊ कडू तसेच सोलापूर जिल्हा अध्यक्ष दत्तात्रय मस्के पाटील यांच्या आदेशाने ही नियुक्ती झाली असून राहुल गाडे यांच्याकडून गोरगरीब जनतेच्या प्रश्न सोडवण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून चांगले कार्य केले जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे
यावेळी सोलापूर जिल्ह्या अध्यक्ष- दत्ताभाऊ मस्के-पाटील सोलापूर शहर अध्यक्ष- अजितभाऊ कुलकर्णी, जिल्हा संपर्क प्रमुख- जमीरभाई शेख सोलापूर जिल्ह्या धरणग्रस्त अध्यक्ष. रणजित जगताप सोलापूर शहर कार्याध्यक्ष- खलीद मणीयार जिल्हा युवक आध्यक्ष - संतोष पवार करमाळा तालुका आध्यक्ष- संदीप तळेकर मंगळवेढा तालुका अध्यक्ष- राजकुमार स्वामी बाळासाहेब पाटील, आनंद सोमासे, पांडूरंग पाडगळ, सिकंदर खरे, सागर गाडे, आदी पदाधिकारी व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते
तळागाळातील लोकांसाठी काम करणाऱ्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या पंढरपूर तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री बच्चू कडू प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय मस्के पाटील यांनी तसेच समाजाच्या विविध घटकातून राहुल गाडे यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
-------------------
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा