अभिष्टचिंतन सोहळ्यास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
आपल्या समाजासह पक्षावर निष्ठा ठेवून निष्ठेने काम करणारे, आदिवासी हिंदू कोळी महादेव समाजाचे नेतृत्व तथा नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे सहसचिव आणि बरबडा नगरीचे लोकप्रिय मा.सरपंच व पंचायत समिती सदस्य प्रतिनिधी, समाजाचे भूषण, निष्ठावंत बहुजन नेते बालाजीराव मद्देवाड यांच्या होणाऱ्या अभिष्टचिंतन सोहळ्यास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बरबडा नगरीमध्ये दिनांक 3 मार्च 2023 रोजी बहुजन समाजाचे नेते बालाजीराव मद्देवाड यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कीर्तन रुपीसेवा व या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तर माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण व माजी आमदार वसंतराव चव्हाण यांची खंदे समर्थक म्हणून प्रसिद्ध असलेले आणि गेल्या 25 ते 30 वर्षापासून सामाजिक व राजकीय कारकीर्दतील कार्यरत असलेले बालाजी मद्देवाड यांनी अनेक पदे उपभोगली आहेत परंतु त्यांनी कधीही जनसामान्य माणसाची नाळ तुटू दिली नाही.
नायगाव तालुक्यासह सबंध नांदेड जिल्ह्यात एक प्रमाणिक काँग्रेस कार्यकर्ता म्हणून त्यांचा परिचय आहे, आदिवासी हिंदू कोळी महादेव समाजाच्या कोणत्याही कार्यक्रमास हिरारीने सहभागी होतात, नव्हे तर समाजाचे कुशल नेतृत्वही ते आवर्जून करतात म्हणून येत्या 3 मार्च रोजी त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या हितचिंतकाकडून बरबडा नगरीमध्ये ह.भ.प. शिवलीलाताई पाटील यांची कीर्तन आयोजित केलेले आहे तरी या निमित्ताने विविध कार्यक्रमाचेही उपक्रम राबविल्या जाणार आहेत या होणाऱ्या अभिष्टचिंतन सोहळ्यास जास्तीत जास्त संख्येने जनतेनी सहभागी होऊन एका सच्या निष्ठावंत बहुजन नेते बालाजी मद्देवाड यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा व आशीर्वाद देण्यासाठी जनतेने जास्तीत जास्त संख्येने बरबाडा येथे उपस्थित रहावे असे नम्र आवाहन कोळी महासंघाचे युवा जिल्हाध्यक्ष प्रल्हाद मद्देवाड, नगरसेवक हनुमंत बोईनवाड, सूर्यकांत पोलकमवाड, देविदास तमन बोईनवाड,माधव ऐंजपवाड, नागेश ऐंजपवाड यांनी केले आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा