विशेष अतिथी म्हणून शेतकऱ्यांना करणार मार्गदर्शन
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
नायगाव तालुक्यातील कुंटूर येथे आंतर्राष्ट्रिय पुरस्कार प्राप्त शेती वैज्ञानिक, संशोधक, कृषिरत्न, कृषिभूषण श्री चंद्रशेखर भडसावळे करणार शाळेच्या शेतकरी पालकांना मार्गदर्शन.
अनेक नवनवीन व सृजनशील, पर्यावरणपूरक उपक्रमांसाठी प्रसिद्ध असलेल्या दि ओयासिस इंग्लिश मेडियम स्कूल कुंटूरचा “ कार्ट ब्लांश” हा पाचवा सांस्कृतिक कार्यक्रम दि. ४ मार्च रोजी सायं ६ वाजता आयोजित केला आहे. या कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून श्री चंद्रशेखर भडसावळे उपस्थित राहणार आहेत.
श्री चंद्रशेखर भडसावळे यांची पर्यावरण पूरक, कमि-खर्चाची, शून्य मशागत शेती या विषयावर भारतातच नाही तर परदेशातहि अनेक भाषणे झाली आहेत ज्यात थायलंड, व्हीयतनाम, एफ.ए. ओ. रोम, इझ्रायील, स्वीत्झर्लंड, अमेरिका अशा देशांचा समावेश आहे. पारंपारिक शेती करून शेतकरी कर्जबाजारी बनत चालला आहे. ह्या चुकीच्या शेती करण्याच्या प्रचलनाने मातीतला शेंद्रीय कर्ब कमी होवून सूक्ष्मजीव सृष्टीचा ह्रास होतो आहे. पिकाला नाहीतर मातीला पोसणे गरजेचे आहे अन्यथा आपली जमीन वाळवंट व्हायला वेळ लागणार नाही त्या करिता शेतकर्यांना हि पारंपारिक पद्धती बदलून पर्यावरण पूरक, शुण्य मशागतीची एस. आर.टी. शेती पद्धती अवलंबणे हि काळाची गरज आहे. ह्या पद्धतीची भारता सारख्या कृषी प्रधान देशाला अत्यंत गरज आहे. व ती सर्वदूर नेण्याचा प्रयत्न श्री चंद्रशेखर भडसावळे हे करीत आहेत.
ग्रामीण भागातील शाळेचा पालक हा मुख्यत: शेतकरी आहे त्यांचा विकास झाला तर देशाचा विकास होईल या हेतूने शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे औचीत्य साधून शेतकऱ्यांचे हित व्हावे या हेतूने श्री चंद्रशेखर भडसावळे यांना निमंत्रित करण्यात आले व ह्या कार्यक्रमाचा नायगाव तालुक्यातील सर्व शेतकर्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन शाळेचे संस्थापक श्री राजेश देशमुख कुंटूरकर व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. कविता सोनपारखे यांनी केले आहे. कार्यक्रमाचे उदघाटक श्री केशव गड्डम तर अध्यक्ष स्थानी राजेश कुंटूरकर हे असतील.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा