रुग्णालय बंद असल्याने रुग्णांचे होत आहेत हाल
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी, शिवाजी कुंटुरकर)
बिलोली तालुक्यातील मौजे गागलेगाव येथील आरोग्यवर्धिनी केंद्र हे सातत्याने बंद असल्याने येथील प्रमुख डॉक्टर रामपुरे हे गैरहजर का राहतात हा प्रश्न असला तरी येथील संपूर्ण स्टॉप देखील हजर राहत नसल्याने रुग्णाची दिवसेंदिवस हाल होत असल्याने येथे कायमस्वरूपी डॉक्टर देण्यात यावे अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
गागलेगाव हे गाव बिलोली नायगाव उमरी धर्माबाद च्या मध्यभागी आहे या गावासह परिसरातील लोकांना जवळपास कोणताही दवाखाना उपलब्ध नसल्याने शासनाने लाखो करोडो रुपये खर्च करून मौजे गागलेगाव येथे आरोग्यवर्धिनी केंद्राची उभारणी केलेली आहे परंतु येथे सातत्याने डॉक्टर उपलब्ध नसतात व स्टॉप हि उपलब्ध नसते म्हणून रुग्णाची बेहाल दिवसेंदिवस होत असल्याने येथे सातत्याने गैरहजर राहत असलेल्या डॉक्टरांवर कारवाई करावी आणि आम्हाला कायमस्वरूपी रुग्णासाठी डॉक्टर व संपूर्ण स्टॉप देण्यात यावा अशी मागणी गागलेगाव सह परिसरातील नागरिकांतून मागणी होत आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा