राज्यात दहावी बोर्डाच्या परीक्षा सुरू
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
नायगाव तालुक्यातील कुंटुर येथील जिल्हा परिषद हायस्कूल मधिल विद्यार्थ्यांचे दहावी एसएससी बोर्ड 2023 ची परीक्षा सुरळीत प्रमाणे पार पडली या कुंटुर केंद्र क्रमांक 5276, कुंटुर जिल्हा परिषद महाविद्यालय कुंटुर, शांतीनिकेतन विद्यालय कुंटुर , कै.नारायण पाटील विद्यालय सांगवी, सातेगाव सरस्वती विद्यालय सातेगाव, परीक्षेसाठी 218 एकूण विद्यार्थी होते यापैकी 211 विद्यार्थी उपस्थित व सात विद्यार्थी गैरहजर होते. त्यामुळे कुंटूर जिल्हा परिषद शाळेमध्ये काफी मुक्त वातावरणामध्ये सुरळीत परीक्षा पार पाडली असून केंद्र संचालक संजय राजपुत्त हे होते, साहाय्यक संचालक अरविंद जामकर, परवेशक त्र्यंबक स्वामी, बैठै पथक बी एस मुधळेतलाटि, केंद्र चालक रावन चिखलवाड, शिक्षक बाबुराव बावने, मुंडे, पदमावार, पांडे सर, महादळे , चौहाण, कदम आदी उपस्थित होते. पोलीस बंदोबस्त हे कडे कोट असल्याने या परीक्षांमध्ये अनुचित प्रकारही घडवण्यास कोणतेही वाव मिळाले नसल्यामुळे जिल्हा परिषद ची शाळा व परीक्षा एकदम सुरळीत असल्याचे नागरिकांतुन बोलया जात आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा