बीड केज हायवेवर स्विफ्ट कारचा भीषण अपघात
शिवशाही वृत्तसेवा बीड जिल्हा प्रतिनिधी सुनील धिमधिमे
केज-बीड रोडवर कोरेगाव जवळ अपघातात कार पलटी होऊन अपघात झाला. त्या अपघातात माजी नगरसेवक पप्पू (आण्णा) इनामदार यांचा मृत्यू झाला. तर पोलीस जमदार सय्यद चाँदहे जखमी झाले आहेत.
या बाबतची माहिती अशी की, दि २ मार्च रोजी सायंकाळी ६:३० च्या सुमारास माजी नगरसेक तथा विद्यमान नगरसेविका इनामदार यांचे पती पप्पू अण्णा उर्फ गजमफर इनामदार आणि केज पोलिस ठाण्यातील पोलीस जमादार सय्यद चाँद हे हे दोघे स्विफ्ट डिझायर क्र (एम एच ०४/ ई एफ ७५५७) गाडीने बीडच्या दिशेने जात असताना केज-बीड रोडवर कोरेगाव जवळील तांदळे वस्ती जवळ समोरून येणाऱ्या वाहनाला साईड देताना कार रस्त्याच्या खड्ड्यात जाऊन ती पलटी झाली त्यात गंजफर उर्फ पप्पू आण्णा यांच्या डोक्याला गंभीर मार लागला तर यांचा मृत्यू झाला. तर त्यांच्या सोबत असलेले पोलीस कर्मचारी सय्यद चाँद हे जखमी झाले जखमी पोलीस कर्मचारी सय्यद चाँद यांना बीड येथील दवाखान्यात दाखल केले आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा