एक आरोपी अद्यापही फरार तर तिघेजण गुन्हेगारी पार्श्वभूमीचे
शिवशाही वृत्तसेवा मंगळवेढा (प्रतिनिधी राज सारवडे)
जत - सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात दिनांक 17 मार्च रोजी दुपारी पावणेदोन च्या सुमारास विजय शिवाजी ताड राहणार तालुका जत जिल्हा सांगली हे त्यांच्या इनोव्हा क्रमांक एम. एच. १० सी. एन. ०००२ या गाडीतून त्यांच्या मुलाला शाळेतून घरी आणण्यासाठी जात असताना बबलू उर्फ संदीप शंकर चव्हाण व त्याच्या साथीदारांनी मोटरसायकलवर येऊन अज्ञात कारणावरून त्यांच्यावर पिस्तुलातून गोळीबार करून नंतर दगडाने त्यांचे डोके ठेचून त्यांचा खून केला होता ही घटना अल्फोन्सो शाळेजवळ घडली होती. मयत विजय ताड हे राजकीय व्यक्तिमत्व असल्याने या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती दरम्यान जर पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास चालू केला होता आणि आता या गुन्ह्यातील चार आरोपींना पोलिसांनी गजाआड केले आहे.
घटनेनंतर सांगलीचे पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांच्या सूचनेनुसार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे , सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे पोलीस उपनिरीक्षक विशाल येळेकर अशी वेगवेगळी तीन पथके तयार करून पुण्याचा तपास सुरू केला होता तिन्ही पथकांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार यांना गुप्त बातमी दाराकडून मिळालेल्या माहितीनुसार व पोलीस नाईक संदीप नलावडे व प्रकाश पाटील यांनी केलेल्या तांत्रिक पृथकरणांनुसार हा गुन्हा बबलू उर्फ संदीप शंकर चव्हाण व त्याचे साथीदार यांनी केला असल्याबाबत माहिती मिळाली हे संशयित आरोपी कर्नाटक राज्यातील गोकाक येथे असल्याची पोलिसांना कोण कोण लागली त्यानुसार पथक तेथे पोहोचले आणि सापळा लावून चौघा आरोपींना पोलिसांनी गोकाक एसटी स्टँड परिसरातून ताब्यात घेतले
पंचासमक्ष त्यांची प्राथमिक चौकशी केली असता आरोपी शंकर चव्हाण वय 27 राहणार समर्थ कॉलनी जत निकेश उर्फ दाद्या दिनकर मदने वय 24 राहणार डिग्रज तालुका मिरज आकाश सुधाकर व्हनखंडे वय 24 राहणार केएम हायस्कूल जवळ सातारा फाटा जत आणि किरण विठ्ठल चव्हाण वय 27 राहणार आर आर कॉलेज जवळ जत अशी आरोपींची नावे असल्याचे समजले सदर कुण्याबाबत पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास आणि चौकशी केली असता मुख्य आरोपी बबलू उर्फ संदीप चव्हाण यांनी वरील तीन आरोपी सहकाऱ्यांच्या मदतीने व सांगण्यावरून हा गुन्हा केल्या असल्याचे कबूल केले 14 आरोपींना पुढील तपासासाठी पोलिसांना अटक केली असून चौकशीत आरोपी बबलू उर्फ संदीप चव्हाण हा पोलीस रेकॉर्डवरील आरोपी असून त्याच्यावर जत पोलीस ठाणे येथे खुनाचा प्रयत्न मारामारी यासारख्या गंभीर स्वरूपाचे सहा गुन्हे दाखल आहेत त्याचबरोबर 2018 साली एम पी डी ए अंतर्गत एक वर्षाकरिता स्थान पद्धतीची कारवाई करण्यात आलेली आहे
आरोपी निकेश उर्फ दाद्या दिनकर मदने याच्यावर देखील विश्रामबाग सांगली ग्रामीण मिरज ग्रामीण व जत या पोलीस ठाण्यामध्ये खंडणी दरोडा गंभीर दुखापत मारामारी यासारखे चार गुन्हे आहेत तर आकाश व्हनखंडे या आरोपीवर देखील जत पोलीस ठाणे येथे खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यातील आणखी एक आरोपी व सुत्रधार फरार असून उमेश सावंत असे त्याचे नाव आहे त्याचा शोध पोलीस घेत आहेत. या गुन्ह्याचा पुढील तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगलीचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे हे करत आहेत.
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा