अरूण बनसोडे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त स्थापना
शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेडराजा (तालुका प्रतीनिधीआरिफ शेख)
सिंदखेडराजा तालुक्यातील वाघाला गावांतील अरूण बनसोडे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त बनसोडे कुटुंबाच्या वतीने बुद्ध विहारास बुद्ध मूर्ती देवून त्याची स्थापना करून आदरांजली अर्पण करण्यात आली . या मूर्तीचे अनावरण सरपंच विष्णू काकडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर दिनकर सोनवणे ,महाराष्ट्र सेनेचे जिल्हाध्यक्ष भारत साळवे ,उपसरपंच सखाराम मळेकर ,ग्राम पंचायत सदस्य अंकुश राठोड ,राजेंद्र वायाळ,बाळू बनसोडे,किसन चव्हान ,अनिल गवई,किशोर चव्हाण ,दिलीप चव्हाण, तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा