सामाजिक कार्यकर्ते गंगाधर मेडकर यांचे नांदेड जिल्ह्यधिकारी कार्यालया समोर अमरण उपोषण सुरू
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कंटूरकर
नायगाव तालुक्यातील मांजरम ग्रामपंचायत कार्यालयातील सार्वजनिक निधीचा अपहार झाल्याचे चौकशी करण्यात आलेल्या चौकशीत सिद्ध झालेल्या प्रकरणात प्रशासनाने अपहार करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून सदरील अपहार केलेल्या संबंधितांकडून अपहार कलेली रक्कम वसूल करून निलंबित करण्यात यावे व दप्तर दिरंगाई करणाऱ्या गटविकास अधिकारी पंचायत समिती नायगाव यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मा.विभागीय आयुक्त यांच्याकडे पाठविण्यात यावे या मागणीसाठी मांजरम येथील सामाजिक कार्यकर्ते गंगाधर मेडकर यांनी मा.जिल्हाधिकारी नांदेड यांना दि. 16 मार्च 2023 रोजी निवेदन देऊन निवेदनातुन मागणी केली.
ग्रामपंचायत कार्यालय मांजरम च्या सार्वजनिक हितार्थ निधी अपहार प्रकरणात तक्रारी निवेदन दिल्यानंतर त्यावर प्रदीर्घ कालावधीनंतर या प्रकरणाची चौकशी झाली. या करण्यात आलेल्या चौकशीत 24,50,734 (अक्षरी चोवीस लक्ष पन्नास हजार सातशे चौतिस रूपये) रुपयांचा अपहार केल्याचा सिद्ध झाला त्या चौकशी मध्ये माजी सरपंच सौ.स्वाती सुरेश योगेकर,तत्कालीन ग्राम विकास अधिकारी वडजे एस.जी.व पंचायत समिती नायगाव कार्यालयातील बांधकाम विभागातील डेपुटी शाखाअभियंता जिरवनकर एम.ए. हे दोषी असल्याचे सिद्ध झाले.
त्यामुळे सदरील प्रकरणात दोषीं आसलेल्या दोषींवर कार्यवाही करण्यात यावी अशे वेळोवेळी निवेदन देऊनही कार्यवाही करण्यात आली मात्र सदरील दोषींनवर कार्यवाही न केल्यामुळे दि. 24 फेब्रुवारी 2023 रोजी मा.जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांच्या कार्यालया समोर अमरण उपोषण करण्यात आले.त्यामुळे अमरण उपोषण माघार घेण्यासाठी प्रशासनाकडून विंनती करण्यात आली सदरील प्रकरणातील दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे रोज नामयात मंजुरी नोट केली आणी नायगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी मा.निवासी जिल्हाधिकारी नांदेड यांच्या समोर सदरील प्रकरणात आसलेल्या दोषींनवर पोलीस ठाणे नायगाव (खै.) येथे गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिल्यामुळे अमरण उपोषण तात्पुरते माघार घेऊन प्रशासनास सहकार्य करण्यात आले,मात्र या प्रकरणात दोषी आसलेल्या दोषींनवर कार्यवाही करण्यात आली नाही.
सदरील प्रकरणातील दोषीं आसलेल्यान कडून संबधित प्रकरणातील अधिकाऱ्याने मोठी रक्कम घेऊन प्रकरण कायम दडपण्याचा प्रयत्न करीत आसल्याचे निवेदनात उल्लेख केलेला आहे व त्या अनुषंगाने गटविकास अधिकारी पंचायत समिती नायगाव (खै.) यांनी संबधित दोषींनवर गुन्हे दाखल करण्याऐवजी फेरचौकशीची नोटीस तामील करून सदरील प्रकरण कायम बंद करण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यामुळे सदरील प्रकरणात दोषीं आसलेल्या दोषींनवर तात्काळ कार्यवाही करून संबंधितांकडून अपहार केलेली रक्कम वसूल करून शासन खाती जमा करण्यात यावी. या मागणीसाठी मा.जिल्हाधिकारी नांदेड यांना दि. 16 मार्च रोजी निवेदन देऊन जिल्ह्यधिकरी कार्यालय नांदेड यांच्या कार्यालया समोर मांजरम येथील सामाजिक कार्यकर्ते गंगाधर मेडकर हे उपोषणास बसले आहेत.
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा