ईटीएस मोजणी करून फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
नायगाव तालुक्यातील महसूल विभागातील अधिकाऱ्याची वचक नसल्याने अवैध रित्या माती उत्खनन करणाऱ्या माफियानी उच्छाद मांडला आहे. अवैध उत्खनन करणाऱ्यावर तहसील कार्यालयातील कुणाचाच अंकुश नसल्याने तालुक्यातील गोदाकाठ माफियाच्या विळख्यात पडला आहे.
नायगाव तालुक्यातील गोदावरी नदिकाठावरील मनूर गट क्र 43 या गावात शासनाने मातीची परवानगी दिली. परवानगी दोनशे ब्रास अन उत्तखनन हजारो ब्रास असा प्रकार चालू असताना महसूल विभाग मात्र डोळ्यावर पट्टी अन कानावर हाथ ठेऊन असल्याचे चित्र आहे.गोदावरी नदीचे नैसर्गिक सौंदर्य महसूल विभागाच्या नाकर्तेपणामुळे संपुष्टात येत आहे. वारंवार होणाऱ्या अवैध उत्खननामुळे नदीपात्रास धोका निर्माण झाला आहे.
महसूल विभागाने दोनशे ब्रासची परवानगी जरी दिली असली तरी उत्खनन माञ दोन हजार ब्रास झाले असल्याचे चित्र आहे. नायगाव तहसील कार्यालयामार्फत तेरा फेब्रुवारी ते बावीस फेब्रुवारी पर्यंत मनूर शिवारात बालाजी गंगाप्रसाद नायगावकर यांना मातीची परवानगी देण्यात आली होती. देण्यात आलेल्या परवाना पावतीवर दिनांक व वेळ न टाकताच एकाच पावतीवर अनेक चकरा करत मोठ्या प्रमाणात बेसुमार माती उतखणन करण्यात आले.पावतीवर इनवाईस नंबर न टाकता पावती दिली जाते वाहनात सहा ब्रास पेक्षा अधिक माती नेताना चे चित्र निदर्शनास दिसत असले तरी पावती माञ दोन ब्रास ची दिली यात
शासनाच्या नियमाप्रमाणे नदीपात्रापासून तिनशे मीटरच्या अंतरावर उतखनन करणे गरजेचे असताना नियम धाब्यावर बसून नदीलगतंच बेसुमार उतखणन चालू आहे. खाणान किती झाले किती शिल्लक आहे हे पाहण्यासाठी संबंधित विभागाचे कर्मचारी येत नसल्याने माफियाचा मनोमणी कारभार चालू आहे. त्यामुळे तलाठी व मंडळ अधिकारी अप्रत्यक्ष पांठिंबा तर देत नाहीत ना असा सवाल उपस्थित केला जात आहे.
महसूल विभागाकडून वाहतूक करणार्या गाडीचे नंबर परवानगी पञावर दिले जाते. प्रत्यक्षात माञ जागेवर दुसऱ्याच भलत्या सलत्या अधिकच्या गाडयाच्या रांगा लागलेल्या असतात. असेच मनूर येथील माती ची पावती दिली पण एम एच 40 BL 2961 ह्या गाडीचा क्रमांक दिलेल्या परवानगीत नसल्याचे चित्र दिसत आहे मनूर येथे झालेले माती उत्खनन जवळ पास विस ते पंचवीस हायवाच्या सह्याने उत्खनन आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात गाड्यांचा ताफा असून सुद्धा महसूल विभाग डोळेझाक करत आहे. विशेष म्हणजे यातील अनेक गाड्यावर नंबर प्लेट नसल्याचे गंभीर चित्र पाहायवास मिळाले.
उपविभागीय अधिकारी बिलोली सचिन गिरी व तहसीलदार गजानन शिंदे नायगाव यांच्या सहकार्यामुळेच अन अप्रत्यक्ष पाठिंब्या मुळेच माफिया गोदाकाठी हैदोस घालत असल्याची चर्चा आहे. अधिकाऱ्याच्या अर्थपूर्ण व्यवहारामुळे शासनाचा लाखो रुपयाचा महसूल बुडत असल्याची जोरदार चर्चा आहे. अवैध माती उत्खननाची ईटीस मशिनद्वारे मोजणी करून शासनाचा महसूल बुडणाऱ्या ठेकेदाराविरुद्धात कायदेशीर कारवाई करून सात बाऱ्यावर बोजा टाकण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे
तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांच्या अहवालाला तहसीलदारा कडून केराची टोपलीनायगाव तालुक्यात तहसीलदारांच्या पाठिंब्यामुळे गोदावरी काठचे माती चे नैसर्गिक सौंदर्य संपुष्टात गट नं 43 मध्ये 200 ब्रास ची परवानगी उत्खनन माञ दोन ते तिन हजार ब्रास उत्खनन झालेल्या जागेचा तलाठी व मंडळ अधिकारी यांनी दिलेल्या अहवालाला तहसीलदारा कडून केराची टोपली दाखवली जात आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा